राजकोट | मुबंईकर सरफराज खान याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं. सरफराजला फर्स्ट क्लास क्रिकेटमधील अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली. सरफराजने या संधीचं सोनं केलं. सरफराजने इंग्लंड विरुद्ध राजकोटमध्ये डेब्यूतच अर्धशतक झळकावत आपली छाप सोडली.सरफराजने टेस्ट क्रिकेटमध्ये वनडे स्टाईल फिफ्टी पूर्ण केली. मात्र रवींद्र जडेजाने त्याचा घात केला. जडेजाच्या एका चुकीमुळे सरफराज खानच्या अप्रतिम खेळीचा दुर्देवी अंत झाला.
रवींद्र जडेजा शतकाच्या उंबरठ्यावर होता. त्याला 1-2 धावांचीच गरज होती. जडेजाने फटका मारुन नॉन स्ट्राईकवर असलेल्या सरफराजला धावण्यासाठी सांगितलं. मात्र बॉल फिल्डरच्या जवळ येताच जडेजाने घूमजाव केला. मात्र सरफराजने क्रीझ सोडली होती. ऐनवेळेस जडेजाने घूमजाव केल्याने सरफारजाला मागे परतावं लागलं. मात्र तोवर उशीर झाला होता. अशाप्रकारे सरफराज खान रन आऊट झाला. जडेजाच्या कॉलवर सरफराज रन आऊट झाल्याने कॅप्टन रोहित शर्मा हा देखील संतापला.
जडेजाच्या एका चुकीमुळे सरफराजच्या चांगल्या खेळीचा अंत झाला. जडेजाची ही कृती डग आऊटमध्ये असलेल्या रोहितला पटली नाही. रोहितने कॅप रागात फेकत आपला संताप व्यक्त केला. रोहितच्या या संतापाचा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जेम्स एंडरसन टीम इंडियाच्या डावातील 82 वी ओव्हर टाकत होता. एंडरसनने ओव्हरमधील पाचवा बॉल टाकला. जडेजाने बॉल मारला आणि सिंगलसाठी सरफराजला कॉल दिला. मात्र जडेजाने 2 पाऊन पुढे आल्यानंतर सरफराजला मागे जायला सांगितलं. मात्र तोवर मार्क वूड याने कोणतीही चूक न करता डायरेक्ट थ्रो केला. वूडच्या सुदैवाने आणि सरफराजच्या दुर्देवाने थ्रो थेट स्टंपवर लागला. त्यामुळे सरफराजला मैदानाबाहेर जावं लागलं. सरफराजच्या खेळीचा अशाप्रकारे द एन्ड झाला. सरफराजने 66 बॉलमध्ये 9 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 62 धावा केल्या.
रोहित शर्माचा संताप
Rohit Sharma is unhappy with Selfish Ravindra Jadeja who ran out #SarfarazKhan.
Jadeja was too mean to betray a debutant. Nevertheless, Well Played Sarfu 🔥pic.twitter.com/oa3CoF8fxF
— Amock (@Politics_2022_) February 15, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.