INDW vs AUSW | दीप्ती शर्मा पाच विकेट घेत 41 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडत ठरली पहिली खेळाडू

| Updated on: Dec 31, 2023 | 12:10 AM

IND W vs AUS W 2nd ODI : वुमन्स टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना हरला असला तरी टीम इंडियाची स्पिनर दीप्ती शर्मा हिने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारी पहिली खेळाडू ठरली होती.

INDW vs AUSW | दीप्ती शर्मा पाच विकेट घेत 41 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडत ठरली पहिली खेळाडू
deepti-sharma five wicket against australia
Follow us on

मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला. सलग दोन सामने गमावल्यामुळे तीन सामन्यांची मालिका पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने 2-0 ने खिशात घातली आहे. या सामन्यात टीम इंडियाची स्पिनर दीप्ती शर्माने एक मोठा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारी करणारी पहिली आशियाई महिला खेळाडू ठरला आहे.

41 वर्षांचा जुना विक्रम मोडला

वनडेमध्ये ऑस्ट्रेलिया महिला संघाविरूद्ध भारतीय महिला खेळाडूचा सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम सँड्रा ब्रिगांझाच्या नावावर होता. 1982 वर्ल्ड कप मध्ये 24 धावांत 4 बळी घेतले होते. त्यानंतर दीप्ती शर्माने हा विक्रम मोडत आपल्या नावावर केला आहे. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पाच विकेट घेणारी दीप्ती सहावी खेळाडू ठरली आहे.

सामन्याचा धावता आढावा

ऑस्ट्रलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 258-8 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. टीम इंडियाला 50 ओव्हरमध्ये 255-8 धावा करता आल्या. अवघ्या तीन धावांनी टीम इंडियाचा पराभव झाला, रिचा घोष हिची 96 धावांची खेळी व्यर्थ गेली.

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, रिचा घोष (डब्ल्यू), स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (W/C), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, अलाना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन