मुंबई : वूमन्स प्रीमिअर लीगमधील पहिल्या पर्वात मुंबई इंडिअन्स संघाने ट्रॉफी पटकावली आहे. फायनलमध्ये दिल्ली संघाचा 7 विकेट्सने पराभव करत इतिहास रचला आहे. दिल्लीचा या सामन्यामध्ये पराभव झाला असला तरी दिल्लीकडून खेळणाऱ्या भारताच्या दोन खेळाडूंनी महिला टी-20 क्रिकेटध्ये अशी कामगिरी पहिल्यांदाच करण्याचा विक्रम केला आहे. सामना हरला असला तरी दिल्लीच्या राधा यादव आणि शिखा पांडे यांनी केलेली खेळी कायम सर्वांच्या आठवणीत राहणारी आहे.
दिल्ली संघाची अतिशय खराब सुरूवात झाली होती. दिल्लीचा डाव 100 धावाही करू शकला नसता. कारण संघाची अवस्था 79-9 अशी झाली होती. शिखा पांडे आणि राधा यादव यांनी 10 व्या विकेटसाठी नाबाद 52 धावांची विक्रमी भागीदारी केली. यामध्ये शिखा पांडेने 17 बॉलमध्ये 27 धावा आणि राधा यादवने 12 बॉलमध्ये 27 धावा केल्या. दोघींच्या 52 धावांच्या भागीदारीमुळे दिल्लीच्या संघाने मुंबईला 132 धावांचं लक्ष्य दिलं होतं.
दिल्लीच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झालेली दिसली. मुंबईचीही सुरूवात खराब झाली होती. यास्तिका भाटिया 4 धावांनी माघारी परतली आणि त्यानंतर हेली मॅथ्यूजही 13 धावांवर परतल्या होत्या. मात्र त्यानंतर नॅट सायव्हर-ब्रंटची नाबाद 60 धावांची विजयी खेळी. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या 37 धावांचेही योगदान महत्त्वाचं ठरलं.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन| हरमनप्रीत कौर (कॅप्टन), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मिन्नू मणी, राधा यादव आणि शिखा पांडे.