मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने देवधर ट्रॉफीमध्ये कमाल करून दाखवली आहे. साऊथ झोनकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने सेंट्रल झोनविरूद्धच्या सामन्यात कडक शानदार गोलंदाजी केली. ज्या फलंदाजाने एकाही बॉलरला सोडलं नव्हतं, ओपनिंगला उतरल्यापासून या फलंदाजाने सर्वांना फोडण्यास सुरूवात केलेली. मात्र अर्जुन तेंडुलकर याने त्याला आपल्या जाळ्यात अडकवत संघाला यश मिळवून दिलं. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या सेंट्रल झोन संघाने 261 धावा केल्या होत्या, यामधील यश दुबे याने सर्वाधिक 77 धावा आणि शिवम मावीने 38 धावा केल्या होत्या. संघाच्या विकेट पडत होत्या मात्र यश दुबेने एक बाजू लावून धरली होती. एकटा मैदानात पाय रोवून उभा राहिला होता मात्र त्याला अर्जुन तेंडुलकर याने माघारी पाठवलं. यशने मारलेला चेंडू फिल्डिंग करत असलेल्या साई सुदर्शच्या हातात विसावला. त्यानंतर शिवम मावीनेगही चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. 38 धावांवर असताना त्यालाही अर्जुनने कॅच आऊट केलं. त्यासोबतच मोहित रेडकर याने 3 विकेट्स घेतल्या आणि साऊथ झोनला विजयासाठी
सेंट्रल झोनने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या साऊथ झोनची सुरूवात ठिकठाक झाली होती. साई सुदर्शन याची नाबाद 132 धावांची शतकी खेळी आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 43 धावांच्या खेळीच्या जोरावर ७ विकेट्सने साऊथ झोन संघाने हा सामना जिंकला.
South Zone bowlers on ?
Arjun Tendulkar gets the well-set Yash Dubey O.U.T ?
Central Zone reach 192/7 with less than 7 overs to go!
Live Stream ? – https://t.co/M03oZDsf3j
Follow the match – https://t.co/2PNA0GOiLC#DeodharTrophy | #CZvSZ pic.twitter.com/A89p9LXvA0
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 1, 2023
दरम्यान, व्यंकटेश अय्यर सेंट्रल झोनचे नेतृत्व करत आहेत तर मयंक अग्रवाल साऊथ झोनचे नेतृत्व करत आहेत. सेंट्रल झोनकडून यश दुबेने सर्वाधिक धावा केल्या. तर व्यंकटेश अय्यर 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आयपीएल स्टार रिंकू सिंगला 36 चेंडूत 26 धावाच करता आल्या.