मुंबईः सतत क्रीडा क्षेत्रातील कोणताही खेळ असो नवनवीन विक्रम आणि नवनवीन घटनाघडामोडी घडत असतात, त्याचप्रमाणे नवनवीन फॉरमॅटमध्ये बदल करून क्रिकेटलाही पूर्वीपेक्षा अधिक रोमांचक आणि वेगवान बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या नव्या फॉरमॅटमध्ये खेळणारे खेळाडू या क्रिकेटला आणखी मजेशीर बनवत आहेत. विशेषत: क्रिकेट विश्वात उदयास आलेल्या नव्या आणि तरुण फलंदाजांनी नवनव्या गोष्टीमुळे क्रिकेटवर आपली हुकमत गाजवली आहे. त्यामध्ये एक नवीन नाव आता जोडले गेले आहे-डेवाल्ड ब्रेव्हिस. दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) या अंडर-19 (under 19) क्रिकेट संघाच्या या नव्या स्टार खेळाडूने (Star player) क्रिकेटच्या नव्या फॉरमॅट जोरदार खेळी करत सामन्यात साठमध्ये षटकारांचा पाऊस पाडत खळबळजनक खेळी केली आहे.
Dewald Brevis just casually smashing 34 (11) deliveries#6ixtyCricket pic.twitter.com/9tyWPnluwh
— Werner (@Werries_) August 25, 2022
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून नवीन 60 चेंडूंची स्पर्धा द सिक्स्टी सुरू झाली आहे. ही स्पर्धा फक्त कॅरेबियन प्रीमियर लीगच्या संघांमध्ये खेळवली जात आहे.
त्यामुळे या स्पर्धेत नुकताच काही सामने झाले आहेत आणि असाच एक सामना जमैका तल्लावाह आणि सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रिओट्स यांच्यामध्ये गुरुवारी 25 ऑगस्ट रोजी खेळला गेला. जमैकाने हा सामना जिंकला असून 19 वर्षीय डेवाल्ड ब्रेविसने सगळ्या सामन्याचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे.
अंडर-19 विश्वचषक ते आयपीएल 2022 पर्यंत आपल्या विध्वंसक फलंदाजीचा प्रसार करणाऱ्या ब्रेव्हिसने आता साठमध्ये स्थान मिळवले आहे, ही किमया मोठे फलंदाजही हे करू शकत नाहीत. ब्रेव्हिसने एकापाठोपाठ एक सलग चार अशा चेंडूंत चार षटकार ठोकत जमैकाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवून दिला. एवढेच नाही तर ब्रेविसने केवळ 11 चेंडू खेळले ज्यामध्ये त्याने 34 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट 309 होता.
मात्र, ही खेळीही पॅट्रियट्सला विजय मिळवून देऊ शकली नाही कारण पॅट्रियट्सचा संपूर्ण संघ अवघ्या 84 धावांमध्येच गारद झाला आणि 55 धावांनी पराभूत झाला. जमैकाने प्रथम फलंदाजी करताना 60 चेंडूत 139 धावा केल्या होत्या. तर जमैकासाठी, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू फॅबियन ऍलननेही धमाकेदार खेळी खेळली, त्यामध्ये त्याच्या बॅटमधून केवळ 18 चेंडूत 45 धावा करण्यात आल्या. या खेळीत अॅलनने 5 षटकार आणि 2 चौकारही लगावले होते.