Dhawal Kulkarni | मुंबईकडून अविस्मरणीय निरोप, धवल कुलकर्णीचा क्रिकेटला रामराम

| Updated on: Mar 14, 2024 | 2:58 PM

Dhawal Kulkarni Retirement | धवन कुलकर्णी याने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाविरुद्ध आपल्या अंतिम सामन्यात 4 विकेट्स घेत मुंबईच्या विजयात अमूल्य योगदान दिलं.

Dhawal Kulkarni | मुंबईकडून अविस्मरणीय निरोप, धवल कुलकर्णीचा क्रिकेटला रामराम
Follow us on

मुंबई | मुंबई क्रिकेट टीमने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईने विदर्भावर 169 धावांनी मात करत विजय मिळवला आहे. मुंबईने विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं आव्हान दिलं होतं. कॅप्टन अक्षय वाडकर याच्या शतकाच्या जोरावर विदर्भाने जोरदार झुंज दिली. मात्र विदर्भाला या महाकाय आव्हानासमोर आणि मुंबईच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकावेच लागले. आपला अखेरचा सामना खेळत असलेल्या धवल कुलकर्णी याने अखेरची विकेट घेत विदर्भाला ऑलआऊट केलं. उमेश यादव याची विकेट धवलच्या कारकीर्दीतील अखेरची शिकार ठरली. यासह एका युगाचा अंत झाला.

धवल कुलकर्णी याने आधीच रणजी ट्रॉफी फायनल आपला अखेरचा सामना असल्याचं जाहीर केलं होतं. धवलने या महाअंतिम सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. धवलने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली. धवलने पहिल्या डावात विदर्भाच्या अथर्व तायडे, अमन मोखाडे आणि करुण नायर या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना आऊट केलं. तर दुसऱ्या डावात उमेश यादव याला आऊट केलं. धवलने दुसऱ्या डावातील वैयक्तिक पहिली आणि टीमसाठी दहावी विकेट घेतल्यानंतर एकच जल्लोष केला. मुंबईच्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर एकच जल्लोष केला. यावेळेस कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्यासह इतर खेळाडूंनी त्याचं अभिनंदन केलं. तसेच स्टेडियममध्ये उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी त्याला स्टँडिग ओवेशन दिलं.

हे सुद्धा वाचा

धवल कुलकर्णी याची फर्स्ट क्लास कारकीर्द

धवल कुलकर्णी याने 95 सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं. धवलने या 157 डावांमध्ये 281 विकेट्स घेतल्या. धवलने 15 वेळा 5 विकेट्स घेतल्या. तसेच 1 वेळा 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच धवलने 110 डावात 8 अर्धशतकांसह 1 हजार 793 धावा केल्या. धवलची 87 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

धवलला अविस्मरणीय निरोप

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.

विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.