World Cup 2023 :’तुझ्या वडिलांनी तुला शिकवलं नाही का?’, सुनील गावस्कर यांनी असा प्रश्न विचारताच मिचेल मार्श म्हणाला…

| Updated on: Oct 17, 2023 | 3:45 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत 12 पर्वात ऑस्ट्रेलियाने पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. यंदाच्या विश्वचषकात निराशाजनक सुरुवात झाली.पण श्रीलंकेला पराभूत करत पुन्हा एकदा ट्रॅकवर येताना दिसत आहे.

World Cup 2023 :तुझ्या वडिलांनी तुला शिकवलं नाही का?, सुनील गावस्कर यांनी असा प्रश्न विचारताच मिचेल मार्श म्हणाला...
World Cup 2023 :सुनील गावस्कर आणि मिचेल मार्श यांच्यात कलगीतुरा, वडिलांचा उल्लेख करत प्रश्न विचारताच दिलं प्रत्युत्तर
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं तेरावं पर्व सुरु आहे.या स्पर्धेत काही संघांनी दमदार सुरुवात केली. तर काही संघांना अजूनही वाट सापडत नाही. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही संघांचं असंच काहीसं आहे. पण ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला पराभूत करत स्पर्धेतील विजयाचा श्रीगणेशा केला आहे. तर श्रीलंकेला अजूनही विजयाची आस लागून आहे. श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच सर्वबाद 209 धावा केल्या आणि विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेने दिलेलं सोपं आव्हान गाठतानाही ऑस्ट्रेलियाची तारांबळ उडाली. संघाच्या 24 धावा असताना दोन गडी गमावले. त्यामुळे मिचेल मार्शवर मोठी जबाबदारी आली. त्यानेही संघाचा डाव सावरला आणि विजयात मोलाची साथ दिली.

सलामीला आलेल्या मिचेल मार्श याने 51 चेंडूत 52 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून देण्यात मदत केली. मिचेल मार्श अजून काही धावा करू शकला असता पण चमिका करुणारत्ने त्याला धावचीत केलं. मिचेल मार्श बाद झाल्यानंतर मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी डाव सावरला.

सामन्यानंतर सुनील गावस्कर यांनी मिचेल मार्श याला काही प्रश्न विचारले. त्यापैकी एका प्रश्नावर मिचेल मार्श याने मजेशीर उत्तर दिलं. मिचेल मार्श याची आक्रमक खेळी पाहून सुनील गावस्करय यांनी मस्करीत विचारलं की, ‘तुला तुझ्या वडिलांनी अशा पद्धतीने फलंदाजी (डिफेन्सिव्ह शॉट) करायला शिकवलं नाही का?’ असा प्रश्न विचारताच मिचेल मार्शनेही त्याच अंदाजात उत्तर दिलं. “मी त्यांच्या खराब स्ट्राइक रेटची भरपाई करत आहे.”, असं त्याने सांगितलं.

मिचेल मार्श याचे वडील ज्योफ मार्श यांच्यासोबत सुनील गावस्कर क्रिकेट खेळले आहेत. मिचेल मार्श याचा स्ट्राइक रेट वडिलांपेक्षा चांगला आहे. ज्योफ मार्श यांचा 117 वनडे सामन्यात स्ट्राइक रेट 55.33 इतका आहे. तर मिचेल मार्श याचा स्ट्राइक रेट 93.85 इतका आहे. ज्योफ मार्श ऑस्ट्रेलियासाठी 50 कसोटी आणि 117 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत 2854 आणि वनडेत 4357 धावा केल्या आहेत.