मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) सध्या धडाकेबाज कामगिरी करतोय. गेल्या सामन्यानंतर केकेआरने (KKR) या अनुभवी खेळाडूला सोडले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने यावर्षी मेगा लिलावात त्याला 5.50 कोटी रुपयांमध्ये निवडले. तेव्हापासून तो फ्रँचायझीसाठी एक महत्वाचं व्यक्तिमत्व बनला आहे. सहापैकी पाच वेळा तो नाबाद राहिला आहे. तसेच मॅच -विनिंग खेळी देखील गाजवताना दिसतो आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या त्याच्या ताज्या खेळीत कार्तिकने 34 चेंडूत 66 धावांनी नाबाद खेळी करत आरसीबीला 16 धावांनी सामना जिंकून दिला. आपल्या खेळीदरम्यान त्याने पाच चौकार आणि पाच षटकारही ठोकले. आता या धडाकेबाज कामगिरीचं क्रिकेट प्रेमींकडून चांगलंच कौतुक झालं. सोशल मीडियावर देखील कार्तिकचीच चर्चा होती. यात एक महत्वाचं नाव समोर आलं. ते म्हणजे रवी शास्त्री यांचं. त्यांनी देखील दिनेशचं कौतुक केलं. त्यांनी दिनेशला टी 20 स्पेशल म्हटलंय.
A T20 Special with all the requisites. It’s when FIZZ goes FLAT in a spit. DK take a bow. @DineshKarthik @RCBTweets #RCB pic.twitter.com/pHmrI82jvW
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) April 16, 2022
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या पाच बाद 92 धावा झाल्या होत्या. कठीण परिस्थिती होती. पण दिनेश कार्तिकने कुठलाही दबाव न घेता आपला खेळ सुरु ठेवला. त्याने 34 चेंडूत नाबाद 66 धावा फटकावल्या. यात पाच चौकार आणि पाच षटकार होते. सहाव्या विकेटसाठी दिनेश आणि शाहबाज अहमदमध्ये 55 चेंडूत नाबाद 97 धावांची भागीदारी झाली. दिनेशच्या या वादळी खेळीमुळेच आरसीबीला 189 ही डोंगराएवढी धावसंख्या उभारता आली. 18 व षटक टाकणाऱ्या मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीची दिनेश कार्तिकने वाट लावली. त्याच्या एका ओव्हरमध्ये 4,4,4,6,6,4, अशा 28 धावा वसूल केल्या. दिनेश कार्तिकच्या या खेळीनंतर यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याला संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. वयाच्या हिशोबाने दिनेश कदाचित निवड समिती सदस्यांना फिट वाटणार नाही. पण आजचा त्याचा फॉर्म पाहिला, तर त्याला भारतीय संघाबाहेर ठेवण हे आपलचं नुकसान करुन घेण्यासारखा आहे. मिडविकेट, कव्हर्सला तो जे काही चौकार-षटकार मारतोय, ते पाहून लाजबाव असेच शब्द तोंडातून बाहेर पडतात. सध्या कौन हैं प्रविण तांबे हा चित्रपट OTT वर गाजतोय. त्यामध्ये श्रेयस तळपदे एक डायलॉग बोलतो. ‘सर ये एज-वेज में विश्वास नही रखता’ दिनेशची सध्याची बॅटिंग पाहली की, हेच शब्द पहिले आठवतात.
इतर बातम्या
RR vs KKR Playing XI IPL 2022: दिग्गज गोलंदाजाचं राजस्थानच्या संघात कमबॅक, कोलकात्याची टीम जैसे थे!