IND vs AUS : रोहित शर्माने चाहत्यांना दिला धक्का, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोण घेईल जागा?

| Updated on: Nov 03, 2024 | 5:02 PM

न्यूझीलंडने भारताला कसोटी मालिकेत 3-0 ने धोबीपछाड दिला आहे. आता भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माने चाहत्यांना धक्का दिला आहे.

IND vs AUS : रोहित शर्माने चाहत्यांना दिला धक्का, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोण घेईल जागा?
Image Credit source: PTI
Follow us on

न्यूझीलंडने पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत पराभूत केलं होतं. त्यानंतर आता कसोटी मालिकेत 3-0 ने मात दिली. न्यूझीलंडने भारताला खोल जखम दिली तसेच त्यावर मीठही चोळल्याचं दिसत आहे. आता भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार सामने जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळे भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या उरल्यासुरल्या आशा आता या मालिकेवर अवलंबून आहेत. असं असताना कर्णधार रोहित शर्माने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवलं आहे. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 स्पर्धा 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला साना पर्थमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. असं असताना कर्णधार रोहित शर्माचं वक्तव्य संभ्रमात टाकणारं आहे. रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबत मोठं वक्तव्य केलं.

कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, ‘मलाच माहिती नाही की या सामन्यात खेळणार आहे की नाही ते. सध्या निश्चित काय सांगता येत नाही. मी जाईल की नाही ते. बघुयात काय होते ते’ रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह प्रेग्नंट असल्याचं चर्चा सोशल मीडियावर आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचं वावड्या उठल्या आहेत. दरम्यान, रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळला नाही तर जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा असेल. अभिमन्यू ईश्वरनला बॅकअप ओपनर म्हणून संघात घेतलं आहे. रोहितच्या गैरहजेरीत ओपनिंगला ईश्वरन येऊ शकतो.

टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपसाठी कोणत्याही संघावर अवलंबून न राहता कामगिरी करायची झाली तर, पाच पैकी चार सामन्यात विजय आणि एक सामना ड्रॉ करणं गरजेचं आहे. जर असं काही झालं नाही तर श्रीलंका हा ऑस्ट्रेलियानंतर दुसरा प्रबळ दावेदार असेल. त्यामुळे ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. श्रीलंकेचा संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तर न्यूझीलंड इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका भारताचं भवितव्य ठरवणार आहे.