भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तान, इंग्लंडनंतर आता श्रीलंकेला लोळवत विजयी हॅटट्रिक केली आहे. टीम इंडियाने 6 विकेट्सने हा सामना जिंकला आहे. श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 114 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 14 चेंडूआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. टीम इंडियाने 17.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 114 धावा केल्या. राजेश कन्नूर याने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. राजेश कन्नूर याने विजयी धावांचा पाठलाग करताना अर्धशतकी खेळी केली. राजशेच्या या खेळीमुळे भारताच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. राजेशने 52 बॉलमध्ये 60 धावांची खेळी केली. तर श्रीलंकेकडून दुलान प्रियाशांथा याने 19 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या.
त्याआधी श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 113 धावा केल्या. श्रीलंकेसाठी गयान गुरत्ने याने 36 चेंडूत 33 धावा केल्या. टीम इंडियासाठी उपकर्णधार रवींद्र संते याने 16 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. तर डेब्यूटंट आकाश पाटील याने 2 विकेट्स मिळवल्या.
दरम्यान टीम इंडियाने श्रीलंकेआधी पाकिस्तान आणि त्यानंतर इंग्लंडला पराभवाची धुळ चारली. टीम इंडियाने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं. त्यानंतर 13 जानेवारीला इंग्लंडवर मात केली. आता टीम इंडिया 16 जानेवारीला पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध भिडणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाचा सलग तिसरा विजय
Victory Sealed! 🇮🇳🔥
India triumphs over Sri Lanka with a commanding 6-wicket win! 🏏💥 A stellar performance by the Indian PD Cricket Team as they continue their winning streak in the tournament. 🙌#AbJunoonJitega #DumHaiTeamMai #DCCI #CricketForAll #bcci #icc #indiancricket pic.twitter.com/MBklM9rdi7
— Differently Abled Cricket Council of India (@dcciofficial) January 15, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : विक्रांत केणी (कॅप्टन), रवींद्र संते (उपकर्णधार), योगेंदर भरोदीया, आकाश पाटील, पवन कुमार, नरेंद्र मंगोरे, जितेंद्र, राजेश कन्नूर, निखील मन्हास, आमिर हसन आणि कुणाल फणसे.