दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेचं पहिल्या पर्वाचा नारळ फुटला आहे.त्यामुळे क्रीडारसिकांना नव्या लीगची मेजवानी मिळणार आहे. पुरानी दिल्ली 6 आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल साउथ दिल्ली सुपरस्टार्सच्या बाजूने लागला. यावेळी कर्णधार आयुष बदोनी याने क्षणाचाही विचार न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली. होम ग्राउंड असल्याने आयुष बदोनीला या मैदानाचा चांगला अंदाज आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने धावांचा पाठलाग करणं सोपं जाईल असं सांगितलं. दुसरीकडे, पुरानी दिल्ली 6 चा कर्णधार ऋषब पंत यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. पण त्याने काही फरक पडणार नाही असं सांगायलाही तो विसरला नाही.
पुरानी दिल्ली 6 : अर्पित राणा, मंजित, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, शिवम शर्मा, वंश बेदी, केशव दलाल, मयांक गुसैन, आयुष सिंग ठाकुर, अंकित भदाना, प्रिंस यादव
साउथ दिल्ली सुपर स्टार्स : आयुष बदोनी (कर्णधार), प्रियांश आर्य, सुमित माथुर, तेजस्वी (विकेटकीपर), दिविज मेहरा, कुंवर बिधुरी, विजन पांचाल, दिग्वेश राठी, कुलदीप यादव, शुभम दुबे, सौरभ देसवाल.
पुरानी दिल्ली 6: ऋषभ पंत (कर्णधार), ललित यादव, इशांत शर्मा, अर्पित राणा, शिवम शर्मा, प्रिन्स यादव, मयांक गुसैन, सनथ सांगवान, अंकित भदाना, युग गुप्ता, केशव दलाल, आयुष सिंग, कुश नागपाल, सुमित चिकारा, वनव बुग्गारा बेदी, मनजीत, यश भारद्वाज, संभाव शर्मा, लक्ष्मण.
साऊथ दिल्ली सुपरस्टार : आयुष बदोनी (कर्णधार), कुलदीप यादव, प्रियांश आर्य, सुमित माथूर, दिविज मेहरा, कुंवर बिधुरी, दिग्वेश राठी, तेजस्वी दहिया, राघव सिंग, सौरभ देसवाल, सार्थक रे, लक्ष्य सेहरावत, तरुण बिष्ट, शुभम पन्हार, सिंग, मयंक गुप्ता, अंशुमन हुड्डा, अनिंदो नहराई, दीपांशू गुलिया.