Cricket | ‘या’ स्पर्धेसाठी टीमची घोषणा, पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल जोडीचा समावेश

| Updated on: Jun 15, 2023 | 11:24 PM

क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. मोठ्या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

Cricket | या स्पर्धेसाठी टीमची घोषणा, पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल जोडीचा समावेश
Follow us on

मुंबई | टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर सध्या विश्रांतीवर आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया विंडिज विरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेचंही वेळापत्रक जाहीर केलंय. या दरम्यान आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही दिवसांनी दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी वेस्ट झोनने संघ जाहीर केला आहे. वेस्ट झोनने 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. प्रियांक पांचाळ वेस्ट झोनचं नेतृत्व करणार आहे. या टीममध्ये भारतीय क्रिकेट संघातील ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ याचा समावेश आहे. याशिवाय चेतन साकरिया, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान या आणि अनेक आयपीएलमधील स्टार खेळाडूंचा समावेश टीममध्ये करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दुलीप ट्रॉफीसाठी टीम वेस्ट झोन

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एकूण 6 झोनल संघामध्ये खेळवण्यात येते. या स्पर्धेतील सामने रणजी ट्रॉफीप्रमाणेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येच ग्राह्य धरले जातात. या दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 28 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 12 ते 16 जुलै दरम्यान अतिंम सामना खेळवण्यात येणार आहे. दरम्यान वेस्ट झोन आधी सेंट्रल झोनसाठी टीमची घोषणा करण्यात आली. या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत शिवम मावी हा सेंट्रल झोन टीमचं नेतृत्व करणार आहे.

दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोन टीम

यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, प्रियांक पांचाळ (कॅप्टन), हार्विक देसाई (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, हेत पटेल (विकेटकीपर), सरफराज खान, अर्पित वसावडा, अतित शेठ, शम्स मुलानी, युवराज डोडिया, धर्मेंद्र जडेजा, चेतन साकरिया, चिंतन गजा आणि अरझान नागवासवाला.

दुलीप ट्रॉफीसाठी सेंट्रल झोन टीम

शिवम मावी (कॅप्टन), उपेंद्र यादव (उपकर्णधार), विवेक सिंह, हिमांशु मंत्री, कुणाल चंदेला, शुभम शर्मा, अमनदीप खरे, रिंकू सिंह, अक्षय वाडकर, ध्रुव जुरेल, सौरभ कुमार, मानव सथर, सारांश जैन, आवेश खान आणि यश ठाकुर.