टीम इंडिया सध्या विश्रांतीवर आहे.टीम इंडियाचा श्रीलंका दौरा आटोपला आहे. बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे. बांगलादेश सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. बांगलादेश टीम इंडिया विरुद्ध या दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 2 सामने होणार आहे. या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. या दरम्यानच्या काळात टीम इंडियातील खेळाडू हे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहेत. बीसीसीआयच्या 2024-2025 देशांतर्गत स्पर्धेचा श्रीगणेशा दुलीप ट्रॉफीने होणार आहे. आपण या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात.
दुलीप ट्रॉफी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा आधी झोनल फॉर्मेटनुसार खेळवण्यात यायची. अध्यक्ष अजित आगरकर आणि निवड समितीने ही स्पर्धा झोनल ऐवजी टीम फॉर्मेटनुसार खेळवण्याचा निर्णय केला. त्यानुसार आता या स्पर्धेत एकूण 4 संघ असणार आहेत. या संघांची नावं ही अनुक्रमे टीम ए, टीम बी, टीम सी आणि टीम डी अशी आहेत. या चारही संघात यंदा टीम इंडियाचे अनुभवी खेळाडूही असणार आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळण्याची संधी फार कमी आहे.
देशांतर्गत स्पर्धा 2024-2025 चं वेळापत्रक
🚨 News 🚨
BCCI announces domestic fixtures for home season 2024-25
Read 🔽https://t.co/iMcwnUi78L@IDFCFIRSTBank pic.twitter.com/p6TLTGGzm0
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 6, 2024
दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 सप्टेंबरला स्पर्धेची सांगता होणार आहे. प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहे. प्रत्येक सामना हा 4 दिवसांचा असणार आहे. सलामीचा सामना हा 5 सप्टेंबरला इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात होणार आहे. याच दिवशी दुसरा सामना हा इंडिया सी विरुद्ध इंडिया डी यांच्यात होणार आहे. स्पर्धेतील सारे सामने अनंतपूर येथे होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
अनुक्रमांक | तारीख | सामना | वेळ |
1 | 5 सप्टेंबर | टीम ए विरुद्ध टीम बी | सकाळी 9 वाजता |
2 | 5 सप्टेंबर | टीम सी विरुद्ध टीम डी | सकाळी 9 वाजता |
3 | 12 सप्टेंबर | टीम ए विरुद्ध टीम डी | सकाळी 9 वाजता |
4 | 12 सप्टेंबर | टीम बी विरुद्ध टीम सी | सकाळी 9 वाजता |
5 | 19 सप्टेंबर | टीम बी विरुद्ध टीम डी | सकाळी 9 वाजता |
6 | 19 सप्टेंबर | टीम ए विरुद्ध टीम सी | सकाळी 9 वाजता |