दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या दिवशी चारही संघ आमनेसामने आहेत. इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना हा एम चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळवण्यात येत आहे. तर दुसर्या सामन्यात इंडिया सी विरुद्ध इंडिया डी आमनेसामने आहेत. हा सामना अनंतपूर येथे होत आहे. इंडिया डीच्या नेतृत्वाची जबाबदारी ही श्रेयस अय्यर याच्याकडे आहे. तर ऋतुराज गायकवाड इंडिया सी या संघाचा कर्णधार आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरची टीम पहिल्या डावात अपयशी ठरली. टीमची बिकट स्थिती झाली होती. मात्र अक्षर पटेलने 86 धावांच्या खेळी करत टीमची लाज राखली. अरक्षने केलेल्या खेळीमुळे इंडिया डीला 100 पार मजल मारता आली.
इंडिया डीचा पहिला डाव हा 48.3 ओव्हरमध्ये 164 धावांवर आटोपला. इंडिया डी कडून अक्षर पटेल याने 118 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह 86 रन्स केल्या. श्रीकर भरत, अर्शदीप सिंह आणि सारांश जैन या तिघांनी प्रत्येकी 13 धावांच योगदान दिलं. तर यश दुबेने 10 धावा जोडल्या. देवदत्त पडीक्कल आणि हर्षित राणा या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर कॅप्टन श्रेयस अय्यर याच्यासह इतर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. श्रेयसने 9, अर्थव तायडे आणि भुईने 4-4 धावा केल्या. तर आदित्य ठाकरे 0वर नॉट आऊट परतला.
इंडिया सी कडून विजयकुमार वैशाख याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर अंशुल कंबोज आणि हिमांशु चौहान या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मानव सुथार आणि ह्रतिक शौकीन या जोडीच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
अक्षर पटेलची फटकेबाजी
Axar Patel on 🔥
Smashes 6⃣4⃣6⃣ off Manav Suthar as he brings up his 50!#DuleepTrophy | @IDFCFIRSTBankhttps://t.co/u0KTJISm6b pic.twitter.com/g8lVbi52Vp
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 5, 2024
इंडिया सी प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), बाबा इंद्रजीथ, आर्यन जुयाल, हृतिक शोकीन, विजयकुमार वैशाख, मानव सुथार, अंशुल कंबोज आणि हिमांशू चौहान.
इंडिया डी प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, यश दुबे, रिकी भुई, श्रीकर भरत, अथर्व तायडे (विकेटकीपर), अक्षर पटेल, सरांश जैन, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि आदित्य ठाकरे.