Cricket : कॅप्टन शुबमन गिल याला मोठा झटका, स्टार बॉलर ‘या’ स्पर्धेतून आऊट

| Updated on: Sep 04, 2024 | 11:58 PM

Shubman Gill : दुलीप ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी काही तास शिल्लक असताना कॅप्टन शुबमन गिल याला मोठा झटका लागला आहे. जाणून घ्या नक्की काय झालं?

Cricket : कॅप्टन शुबमन गिल याला मोठा झटका, स्टार बॉलर या स्पर्धेतून आऊट
shubman gill and ishan kishan
Image Credit source: Shubman Gill X Account
Follow us on

दुलीप ट्रॉफी ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी असे 4 संघ या स्पर्धेत खेळणार आहे. राउंड रॉबिन पद्धतीने या चारही संघांमध्ये सामने होणार आहेत. स्पर्धेतील सामन्याचं आयोजन हे बंगळुरु आणि अनंतपूर येथे करण्यात आलं आहे. पहिल्या दिवशी चारही संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. मात्र त्याआधी इंडिया ए संघाचा कर्णधार शुबमन गिल याला मोठा झटका लागला आहे. इंडिया ए चा गोलंदाज दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या फेरीत खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

प्रसिध कृष्णा या स्पर्धेतील पहिल्या फेरीला मुकणार आहे. प्रसिध गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीच्या जाळ्यात फसलेला होता. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे प्रसिध दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक करेल, अशी आशा होती. मात्र तसं न झाल्याने कॅप्टन शुबमन गिल आणि टीम इंडिया ए संघाला हा मोठा झटका आहे. प्रसिध पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं कॅप्टन शुबमन गिल याने आधीच स्पष्ट केलं आहे. प्रसिध दुखापतीतून पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे प्रसिधला कमबॅकसाठी आणखी काही दिवस लागू शकतात. प्रसिधला शस्त्रक्रियेमुळे आयपीएलच्या 17 व्या मोसमात (2024) खेळता आलं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

प्रसिध कृष्णा आऊट

टीम मॅनजमेंटकडून प्रसिधच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाहीत. मात्र इंडिया ए मध्ये एकसेएक गोलंदाज आहेत. त्यामध्ये आकाश दीप, खलील अहमद,आवेश खान आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे.

इंडिया ए : शुबमन गिल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुश कोटियान, कुलदीप यादव, आकाश दीप, खलील अहमद, आवेश खान, विदवथ कावेरप्पा , कुमार कुशाग्र आणि शास्वत रावत.