दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील इंडिया डी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्याच डावात शम्स मुलानी भारी पडला. एकीकडे झटपट विकेट पडत असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी उतरला आणि कडवी झुंज दिली. शम्स मुलानीने 187 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 89 धावा केल्या. तसेच पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारण्यात यश मिळवलं. पण या धावांचा पाठलाग करताना इंडिया डी संघाचा डाव गडगडला. कर्णधार श्रेयस अय्यरसह दिग्गज फलंदाज फेल ठरले. देवदत्त पडिक्कलने लढत देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला इतरांची साथ मिळाली नाही. त्याने 124 चेंडूत 92 धावा केल्या. त्यामुळे इंडिया डी संघाला 183 धावांपर्यंत मजल मारता आली. इंडिया ए संघाकडे आता 107 धावांची आघाडी असून पुढचा खेळ सुरु आहे. असं असताना संजू सॅमसनच्या खेळीवरून चर्चा रंगली आहे. संजू सॅमसनला दुलीप ट्रॉफीसाठी निवडलं नव्हतं. मग त्याला इंडिया डी संघात स्थान मिळालं. पण पहिल्याच सामन्यात बेंचवर बसण्याची वेळ आली.
दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं. चाहत्यांच्या त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र चाहत्यांचा अपेक्षा भंग झाला. त्याने 6 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 5 धावा करून तंबूत परतला. या खेळीत त्याने एक चौकार मारला. अकिब खानच्या गोलंदाजीवर प्रसिद्ध कृष्णाने त्याचा झेल पकडला. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियातील पुनरागमन खूपच कठीण झालं आहे. श्रीलंका दौऱ्यातही त्याला संधी मिळाली होती. पण दोन वेळेस शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे संजू सॅमसनला संधीचं सोनं करण्यात अपयश येत असल्याची चाहत्यांची धारणा झाली आहे.
Sanju Samson again had a very poor show in the Duleep Trophy.Scored only 5.He is not the first choice player and he can’t waste opportunities like this
What a poor shot By Sanju Samson 😭😭#SanjuSmson #DuleepTrophy #BCCI #INDvsBAN pic.twitter.com/lyiIhJ6WZ2
— JassPreet (@JassPreet96) September 13, 2024
दुसरीकडे, इंडिया ए संघाने चांगली सुरुवात केली आहे. प्रथम सिंग आणि मयंक अग्रवालने संघाच्या धावसंख्येची गती वाढवली आहे. दोघांनी दुसऱ्या डावात अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरचा संघ बॅकफूट गेल्याचं दिसत आहे. सामन्याचा दुसरा दिवस असून जर 300 धावांपर्यंत मजल मारली तर श्रेयस अय्यरच्या संघाला कठीण जाईल. दुसऱ्या डावात खऱ्या अर्थाने श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांची कसोटी लागणार आहे.