Duleep Trophy 2024: पंतची अर्धशतकी खेळी, इंडिया बी तिसऱ्या दिवसअखेर भक्कम स्थितीत, ए विरुद्ध 240 धावांची आघाडी

| Updated on: Sep 07, 2024 | 5:54 PM

India A vs India B 3rd Day Stumps: इंडिया बी ला पहिल्या डावात 90 धावांची आघाडी मिळाली. यासह त्यांनी दुसऱ्या डावात खेळ संपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 150 धावा केल्या आहेत.

Duleep Trophy 2024: पंतची अर्धशतकी खेळी, इंडिया बी तिसऱ्या दिवसअखेर भक्कम स्थितीत,  ए विरुद्ध 240 धावांची आघाडी
rishabh pan fifty
Image Credit source: Bcci Domestic X Acccount
Follow us on

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंडिया बीने इंडिया ए विरूद्धच्या सामन्यात घट्ट पकड मिळवली आहे. इंडिया बीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 31.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 150 धावा केल्या आहेत. तर वॉशिंग्टन सुंदर हा 6 धावांवर नाबाद परतला. इंडिया बीला पहिल्या डावात 90 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. इंडिया बीने अशाप्रकारे 240 धावांची आघाडी मिळवली आहे.

इंडिया बी कडून तिसऱ्या दिवसापर्यंत विकेटकीपर ऋषभ पंत याने सर्वाधिक धावा केल्या. पंतने 47 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. तर सरफराज खान याने 36 बॉलमध्ये 46 रन्स केल्या. यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन अभिमन्यू ईश्वरन ही सलामी जोडी अपयशी ठरली. यशस्वीने 9 तर अभिमन्यू याने 4 धावांचं योगदान दिलं. पहिल्या डावात 181 धावा करणारा मुशीर खान दुसऱ्या डावात मात्र अपयशी ठरला. मुशीरला भोपळाही फोडता आला नाही. तर नितीश रेड्डी 41 बॉलमध्ये 19 रन्स करुन माघारी परतला. यासह तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. आता इंडिया बी चौथ्या दिवशी डाव घोषित करणार की इंडिया ए ला त्यांना रोखण्यात यश येणार? याकडे लक्ष असणार आहे.

सामन्यात आतापर्यंत काय झालं?

इंडिया ए ने टॉस जिंकून इंडिया बी ला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंडिया बीने मुशीर खान याच्या 181 धावांच्या जोरावर 116 ओव्हरमध्ये ऑलआऊट 321 धावांपर्यंत मजल मारतील. मुशीरला नवदीप सैनी याने चांगली साथ दिली. मुशीर आणि सैनी या जोडीने आठव्या विकेटसाठी 205 धावांची विक्रमी भागीदारी केली. मुशीरने 56 धावांचं योगदान दिलं. तर इंडिया ए कडून आकाश दीप याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर खलील अहमद आणि आवेश खान या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कुलदीपने एकमेव पण मुशीर खानची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.

इंडिया बी ला प्रत्युत्तरात 72.4 ओव्हरमध्ये 231 धावाच करता आल्या. बी टीमच्या काही खेळाडूंचा अपवाद वगळता सर्वांना चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्यापैकी एकालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे टीम बी ला 90 धावांची निर्णायक आघाडी मिळाली. इंडिया बीने या 90 धावांच्या आघाडीच्या जोरावर दुसऱ्या डावात 6 विकेट्स गमावून 150 धावा केल्या आहेत. बी टीमकडे यासह 240 धावांची आघाडी आहे.

इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान आणि खलील अहमद.

इंडिया बी प्लेइंग ईलेव्हन: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि यश दयाल.