Duleep Trophy India A vs India B : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, मुशीर खानने शुबमन गिलच्या संघाला झुंजवलं

| Updated on: Sep 05, 2024 | 5:44 PM

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया आणि इंडिया बी संघात सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. या सामन्यात मुशीर खानने कडवी झुंज दिली आणि इंडिया ए संघाला बॅकफूटवर ढकललं.

Duleep Trophy India A vs India B : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, मुशीर खानने शुबमन गिलच्या संघाला झुंजवलं
Image Credit source: Twitter
Follow us on

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया बी संघाने जबरदस्त कमबॅक केलं. मुशीर खानच्या शतकी खेळीमुळे हे शक्य झालं आहे. एकीकडे 94 धावांवर 7 गडी बाद अशी अशी स्थिती असताना मुशीर खान आणि नवदीप सैनीने कडवी झुंज दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिया बी संघाने 7 गडी बाद 202 धावा केल्या होत्या. आठव्या गड्यासाठी मुशीर खान आणि नवदीप सैनीने 212 चेंडूत 108 धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंडिया बी संघाला झटपट बाद करण्यात कर्णधार शुबमन गिलचं स्वप्न भंगलं आहे. दिवसअखेर मुशीर खानने 227 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 105 धावा केल्या. तर नवदीप सैनीने 74 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 29 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावावर शुबमन गिलच्या संघाची पकड सैल झाली आहे. दुसऱ्या दिवशी या जोडीने आणखी धावा जोडल्या तर कठीण होईल.

मुशीर खान आणि नवदीप सैनी दुसऱ्या दिवशी कसा खेळ करतात यावर बरंच काही अवलंबून आहे. जर या जोडीने 300 च्या पार धावसंख्या नेली तर मात्र कठीण होईल. इंडिया बी संघाकडून यशस्वी जयस्वाल 30, अभिमन्यू ईश्वरन 13, सरफराज खान 9, ऋषभ पंत 7, नितीश रेड्डी 0, वॉशिंग्टन सुंदर 0 आणि रविश्रीनिवासन साई किशोर 1 धाव करून बाद झाला आहे. इंडिया संघाकडून खलील अहमद, आकाश दीप आणि आवेश खानने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदर धावचीत झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत बी (प्लेइंग इलेव्हन): अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी, यश दयाल.

भारत ए (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान, खलील अहमद.