टीम इंडिया सध्या महिन्याभरापेक्षा अधिक कालावधीसाठी विश्रांतीवर आहे. टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून मायदेशात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाचे आणि अनकॅप्ड खेळाडू हे बूची बाबू आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहे. बूची बाबू स्पर्धेला 15 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.त्यासाठी बीसीसीआयने बुधवारी 14 ऑगस्ट रोजी पहिल्या फेरीसाठी 4 संघांच्या खेळाडूंची नावं जाहीर केली. या स्पर्धेत युवा विरुद्ध अनुभवी खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 4 संघांमध्ये 6 सामने होणार आहेत. स्पर्धेतील सुरुवातीचे सामने हे चिन्नास्वामी स्टेडियम,बंगळुरु येथे आयोजित करण्यात आले आहेत. तर अखेरचा सामना हा 19 सप्टेंबरला होणार आहे. ही स्पर्धा रॉबिन राउंड पद्धतीनुसार होणार आहे. त्यामुळे प्रत्येक टीम इतर 3 संघांविरुद्ध भिडेल.
दरम्यान दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड़, ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा या आणि टीम इंडियासाठी खेळणाऱ्या इतर खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना या अनुभवी क्रिकेटपटूंच्या अनुभवाचा फायदा होईल. मात्र विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह पहिल्या फेरीत खेळणार नसल्याची माहिती आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक
🚨 NEWS 🚨
Squads for first round of #DuleepTrophy 2024-25 announced
All The Details 🔽 @IDFCFIRSTBankhttps://t.co/EU0RDel975
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 14, 2024
दरम्यान या स्पर्धेतील सर्व सामने हे टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येणार आहेत. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर मोफत सामने पाहता येतील.
टीम ए: शुबमन गिल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा आणि शास्वत रावत.
टीम बी: अभिमन्यू इशवरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी (फिटनेस टेस्ट आवश्यक) , वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, एन जगदीसन (विकेटकीपर), आर साई किशोर आणि मोहित अवस्थी.
टीम सी: ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बाब इंद्रजीथ, हृतिक शोकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाल विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू चौहान, मयंक जुयाल, मयंक मार्कनडे (विकेटकीपर) आणि संदीप वारियर.
टीम डी: श्रेयस लियर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (विकेटकीपर), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर) आणि सौरभ कुमार.