Musheer Khan: धाकट्याचं शतक, थोरल्याचा जल्लोष, मुशीरच्या सेंच्युरीनंतर सरफराजने काय केलं?

| Updated on: Sep 05, 2024 | 9:57 PM

Sarfaraz Khan Celebration After Musheer Khan Century: मुशीर खानच्या शतकानंतर सरफराज खान याने एकच जल्लोष केला. भावाच्या शतकानंतर सरफराजचा आनंद गगनात मावेनासा झाला.

Musheer Khan: धाकट्याचं शतक, थोरल्याचा जल्लोष, मुशीरच्या सेंच्युरीनंतर सरफराजने काय केलं?
sarfaraz khan and musheer khan
Follow us on

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या दिवशी इंडिया बी कडून खेळणारा सरफराज खान अपयशी ठरला. सरफराजला 9 धावाच करता आल्या. मात्र सरफराजच्या धाकट्या भावाने कमाल केली. मुशीर खानने पदार्पणातच शतक ठोकलं. मुशीरच्या शतकानंतर सरफराजने केलेल्या जल्लोषाची आता सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहे. मुशीरने वयाच्या 19 व्या वर्षी 227 बॉलमध्ये नाबाद 105 धावांची खेळी केली. मुशीरने या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकले. मुशीरने या खेळी दरम्यान शतक पूर्ण केलं. सरफराजने मुशीरच्या शतकानंतर ड्रेसिंग रुममध्ये उभा राहत एकच जल्लोष केला. सरफराजच्या चेहऱ्यावर आपल्या धाकट्या भावाच्या शतकाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. सरफराजसह इतर सहकाऱ्यांनी मुशीरचं टाळ्या वाजवत अभिनंदन केलं. बीसीसीआयने या क्षणाचा व्हीडिओ सोशल मीीडियावर पोस्ट केला आहे.

मुशीरने केलेल्या या खेळीमुळे इंडिया बी ला इंडिया ए विरुद्ध दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 विकेट्स गमावून 202 धावांपर्यंत मजल मारता आली. तर नवदीप सैनी 29 धावांवर नाबाद परतला. मुशीर आणि नवदीप या दोघांनी आठव्या विकेटसाठी 108 धावांची नाबाद भागीदारी केली. मुशीर आणि नवदीप या दोघांनी खऱ्या अर्थाने इंडिया बी चा डाव सावरला. इंडिया बी ची 7 बाज 94 अशी अवस्था झाली होती. कॅप्टन अभिमन्यू ईश्वरन आऊट झाल्यानंतर 14 व्या ओव्हरमध्ये मुशीर मैदानात आला होता. तिथून मुशीर आणि नवदीप या दोघांनी जबाबदारीने चिवट खेळी करत निर्णायक शतकी भागीदारी केली.

मुशीरचं शतक, सरफराजचा धमाका

बांगलादेश मालिकेसाठी दावेदारी

मुशीर खान याने या नाबाद शतकी खेळीसह स्पर्धेतील पहिल्याच दिवशी बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावा ठोकला आहे. दुलीप ट्रॉफीनंतर बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे. बांगलादेश या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध कसोटी आणि टी 20i मालिका खेळणार आहे. या आगामी कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर निवड समितीचंही दुलीप ट्रॉफी स्पर्धेकडे लक्ष लागून आहे. अशात मुशीरने शतक करत कसोटी मालिकेसाठी आपली दावेदारी ठोकली आहे.

इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान आणि खलील अहमद.

इंडिया बी प्लेइंग ईलेव्हन: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि यश दयाल.