दुलीप ट्रॉफी स्पर्धेला गुरुवार 5 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 4 संघ सहभागी होणार आहे. तसेच एकूण 6 सामने खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचे अनेक खेळाडू या स्पर्धेनिमित्ताने आमनेसामने येणार आहेत. ऋषभ पंत याचं 2022 साली झालेल्या रस्ते अपघातानंतर रेड बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक होणार आहे. पंतवर प्रत्येकाचं लक्ष असणार आहे. तसेच श्रेयस अय्यर याचंही पुनरागमन होणार आहे. पंत इंडिया बी मध्ये पंत अभिमन्यू इश्वरन याच्या नेतृत्वात खेळणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे बंगळुरु आणि अनंतपूर येथे करण्यात आलं आहे.
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिल दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए या संघातं नेतृत्व करणार आहे. अभिमन्यू इश्वरन हा ‘इंडिया बी’चा कॅप्टन आहे. पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर ‘इंडिया सी’चा धुरा आहे. तर श्रेयस अय्यर याच्याकडे ‘इंडिया डी’ संघाच कर्णधारपद आहे.
पहिल्याच दिवशी 4 संघ आमनेसामने असणार आहेत. पहिल्या सामन्यात इंडिया ए विरुद्ध इंडिया बी भिडणार आहेत. हा सामना बंगळुरुत खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात इंडिया सी विरुद्ध इंडिया असणार आहेत. हा सामना अनंतपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सामन्यांना सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तर मॅच मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक
Can Not Wait! ⏳
The 2024-25 Domestic Season kicks off with the prestigious #DuleepTrophy tomorrow!
ARE YOU READY❓
📺 JioCinema
💻📱 https://t.co/pQRlXkCguc@IDFCFIRSTBank pic.twitter.com/FunqwNrNLm— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 4, 2024
इंडिया ए: शुबमन गिल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुश कोटियान, कुलदीप यादव, आकाश दीप, खलील अहमद, आवेश खान, विदवथ कावेरप्पा , कुमार कुशाग्र आणि शास्वत रावत.
इंडिया बी: अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, एन जगदीसन (विकेटकीपर) यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, मोहित अवस्थी आणि आर साई किशोर.
इंडिया सी: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), बाबा इंद्रजीत, ऋतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर) आणि संदीप वारियर.
इंडिया डी: श्रेयस अय्यर (कॅप्टन), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर) आणि सौरभ कुमार.