देशांतर्गत दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेचा थरार सुरु झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात विचार होईल. अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली इंडिया बी संघ आणि शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली इंडिया ए संघ खेळत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल शुबमन गिलच्या बाजूने लागला आणि त्याने प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात इंडिया बी संघाकडून मुशीर खान वगळता एकही खेळाडू साजेशी कामगिरी करू शकला नाही. यशस्वी जयस्वाल 30 धावा करून तंबूत परतला. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन याने फक्त 13 धावा केल्या. सरफराज खान 9 धावांवर आऊट झाला. अशा स्थितीत मुशीर खानला साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात आला. ऋषभ पंत मैदानात असताना फटकेबाजी पाहायला मिळणार यात शंका नव्हती. पण कर्णधार शुबमन गिलमुळे त्याचा डाव फसला. ऋषभ पंतने उत्तुंग मारलेल्या चेंडूवर नजर ठेवली आणि पाठी धावत जात अप्रतिम झेल पकडला.
शुबमन गिलने संघाचं 36 वं षटक आकाश दीपकडे सोपवलं. 80 धावांवर 3 विकेट गेल्याने इंडिया बी संघावर दडपण होतं. हे दडपण दूर करण्यासाठी ऋषभ पंतने त्याच्या दुसऱ्या चेंडूवर जोरदार प्रहार केला. ऋषभ पंतने मारलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने वर चढला. तेव्हा उलट्या दिशेने धाव घेत शुबमन गिलने उडी घेतली आणि झेल पकडला. शुबमन गिलचा खेळ अवघ्या 7 धावांवर आटोपला आहे. 10 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 7 धावा केल्या. त्यामुळे ऋषभ पंतची कसोटी संघात निवड करताना समितीला विचार करावा लागणार आहे.
What a Catch! & What a Ball! 🔥
✌️ moments of brilliance in ✌️ balls 👌👌
Shubman Gill pulls off a stunning catch to dismiss Rishabh Pant & then Akash Deep bowls a beauty to dismiss Nithish Kumar Reddy#DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/80Cpgat3nF
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 5, 2024
झेल पकडल्यानंतर शुबमन गिलने दुखापतीमुळे खांदा पकडला होता. त्यामुळे थोडं टेन्शन वाढलं होतं. पण आता व्यवस्थित असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाचा जीव भांड्यात पडला आहे. दुसरीकडे, मुशीर खानने एकाकी झुंज सुरु ठेवली आहे. 70 धावांच्या पुढे खेळी करत इंडिया बी संघाचा डाव सावरला आहे. तसेच शतकाच्या दिशेने कूच केली आहे. इतकंच काय तर मुशीर खानची विकेट घेणं इंडिया ए संघाला कठीण जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे निवड समिती त्याचा विचार करू शकते.