दुलीप ट्रॉफी स्पर्धेत झोनल टीम रद्द करून बीसीसीआयने नव्या फॉर्मेटमध्ये बांधणी केली आहे. या बीसीसीआयने ए, बी, सी, डी अशा टीम तयार केल्या आहेत. दुलीप ट्रॉफी 5 सप्टेंबरपासून सुरु होणार असून यासाठी संघही जाहीर केले आहे. शेवटचा सामना 19 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफीत चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य दिलं जाईल, असं दिसतंय. त्यामुळे दुलीप ट्रॉफीचं महत्त्व आणखी वाढलं आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या चारही संघात दिग्गज खेळाडू आहेत. पण बी संघाचं वजन अधिक दिसत आहे. बी संघ फलंदाजी आणि गोलंदाजीत इतर संघांच्या तुलनेत उजवा आहे. संघात टॉपपासून मिडल ऑर्डरपर्यंत फलंदाज आहे. तसेच अष्टपैलू आणि गोलंदाजही आहेत. या संघाचं नेतृत्व अभिमन्यू ईश्वरनकडे आहे.
यशस्वी जयस्वालसोबत ओपनिंगला अभिमन्यू ईश्वरन येऊ शकतो. तर तिसऱ्या स्थानावर मुशीर खान, चौथ्या स्थानावर सरफराज खान, पाचव्या स्थानावर ऋषभ पंतला संधी मिळू शकते. जर ऋषभ पंतच्या फिटनेसचा प्रश्न आला तर मात्र एन जगदीसनला विकेटकीपर बॅट्समन म्हणून संधी मिळेल. रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर असू शकतात. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि यश दयालला गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. आता अभिमन्यू ईश्वरन कोणाला संधी देतो हे सामन्याआधीच स्पष्ट होईल. खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता संभाव्य प्लेइंग इलेव्हन असू शकते. दुसरीकडे, या संघात सर्वाधिक मुंबईकर खेळाडू आहे. मुंबईकर खेळाडूंना क्रिकेटमध्ये खडूस म्हंटलं जातं. त्यामुळेही हा संघ वजनदार वाटत आहे. पण कोणता संघ वरचढ ठरतो हे स्पर्धेतच ठरेल.
टीम बी : अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, मोहित अवस्थी, एन जगदीसन (विकेटकीपर).
टीम ए : शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल, केएल राहुल, मयंक अग्रवाल, रियान पराग, तिलक वर्मा, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आवेश खान, विदवथ कावरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत.
टीम सी : ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, रजत पाटीदार, उमरान मलिक, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, रितिक शौकीन, मानव सुथार, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर), संदीप वारियर.
टीम डी : श्रेयस अयर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, देवदत्त पडिक्कल, ईशान किशन (विकेटकीपर), अर्शदीप सिंह, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर), सौरभ कुमार.