क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दिगग्ज खेळाडू असलेल्या कोचवर 20 वर्षांची बंदी घातली आहे. श्रीलंका संघाचे माजी खेळाडू दुलीप समरवीरा यांच्यावर कारवाई झालीये. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहिता आयोगाच्या तपासणीत समरवीरा यांनी कलम 2.23 चे उल्लंघन केल्याचे आढळून आलं. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटिग्रिटी विभागाने चौकशी केली त्यानंतर दुलीप समरवीरा यांच्यावर 20 वर्षांची बंद घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिलीप समरविक्रम आता ऑस्ट्रेलियामध्ये बीबीएल, वुमन्स बीबीएल कोणत्याच क्रिकेटमध्ये ते कोच म्हणून काम करत नाहीत. दुलीप समरवीरा यांनी केलेले आचारसंहिता 2.23 चे उल्लंघन म्हणजे, म्हणजे खेळाडूसोबत गैरवर्तन करण्याशी संबंधित आहे. यासदंर्भातील सर्व तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र थोडक्यात याचे वर्णन जबरदस्ती आणि अयोग्य असे केले आहे. ज्याचा संबंधित खेळाडूला त्रास झाला.
क्रिकेट व्हिक्टोरियाचे सीईओ निक कमिन्स यांनी दिलीप समरवीराच्या वर्तनाचा निषेध करत आचारसंहिता आयोगाच्या निर्णयाचे समर्थन केले. समरवीराचे वर्तन आमच्या मूल्यांच्या विरोधात आहे आणि क्रिकेट व्हिक्टोरियामध्ये ते कधीही सहन केले जाणार नाही, असंही निक कमिन्स म्हणाले.
दुलीप समरवीरा यांनी महिला बिग बॅश लीग (WBBL) मेलबर्न स्टार्सचे गेले अनेक सीझन सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. तर यंदाच्या वर्षी समरवीरा यांची व्हिक्टोरिया टीमच्या हेडकोचपदी निवड झाली होती. मात्र दोन आठवड्यांमध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. सुरूवातील त्यांना स्वत:च्या मर्जीचा स्टाफ घ्यायचा होता मात्र त्याला मंजुरी न मिळाल्याने राजीनामा दिल्याचं बोललं जात होत. मात्र आता वेगळंच प्रकरण समोर आलं आहे.
Former Sri Lanka international Dulip Samaraweera has received a 20-year ban from Cricket Australia for conduct that has been described as “utterly reprehensible”. He will not be allowed to hold any position within CA, the state associations, BBL or WBBL clubs during that time… pic.twitter.com/QDTTgbaagy
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 19, 2024
दुलीप समरवीरा 1993 ते 1995 मध्ये श्रीलंकेसाठी 7 कसोटी सामने खेळले आणि त्यादरम्यान त्याने 15 च्या सरासरीने 211 धावा केल्या. ODI मध्ये त्याने 5 सामन्यात 22.75 च्या सरासरीने 91 धावा केल्या. श्रीलंकेतील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने दीर्घकाळ चांगली कामगिरी केली. त्याने 136 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सुमारे 40 च्या सरासरीने 7210 धावा केल्या, ज्यामध्ये 16 शतके आहेत.