कोलंबो | एमर्जिंग एशिया कप 2023 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया ए ने बांगलादेश ए वर 51 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. त्यामुळे आता रविवारी 23 जुलै रोजी एशिया कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये महामुकाबला पार पडणार आहे.
बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. टीम इंडियाची सुरुवात आश्वासक झाली. मात्र त्यानंतर बांगलादेशने ठराविक अंतराने टीम इंडियाला झटके द्यायला सुरुवात केली. त्यामुळे टीम इंडियाची बिकट स्थिती झाली. मात्र कॅप्टन यश धूल याच्या निर्णायक अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाला 200 पार मजल मारता आली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 49.1 ओव्हरमध्ये 211 धावा केल्या.
यश धूल याने टीम इंडियाकडून सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. अभिषेख शर्मा याने 34 धावांची खेळी केली. साई सुदर्शन आणि मानव सुथार या दोघांनी प्रत्येकी 21 धावा केल्या. निकीन जोन्स याने 17, राजवर्धन हंगरगेकर याने 15 आणि रियान पराग याने 12 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनी निराशा केली. बांगलादेशकडून एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी 6 जणांनी किमान 1 आणि कमाल 2 विकेट्स घेतल्या.
212 धावांचं पाठलाग करताना बांगलादेशची जबरदस्त सुरुवात झाली. सलामी जोडीने 70 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांगलादेशला गुंडाळायला घेतलं आणि ऑलआऊट केलं. चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशने भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. तांजिद हसन याने सर्वाधिक 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद नईम याने 38 धावा जोडल्या. कॅप्टन सैफ बहसन याने 22 तर महमुदल जॉय 20 याने रन्स केल्या. मेहदी हसन 12 धावा करुन माघारी परतला. तर उर्विरत फलंदाजांना भारतीय बॉलर्सनी झटपट आऊट केलं.
टीम इंडियाकडून निशांत सिंधू याने 5 विकेट्स घेतल्या. मानव सुथार याने 3 जणांना मैदानाबाहेर पाठवलं. तर युवराजसिंह आणि अभिषेक शर्मा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान आता रविवारी 23 जुलै रोजी टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कपसाठी महामुकाबला होणार आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला 60 धावांनी पराभूत करत चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर टीम इंडिया ए ची 2013 पासून अंतिम फेरीत पोहचण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.
टीम इंडिया ए | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधु, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, युवराजसिंह डोडिया आणि राजवर्धन हंगरगेकर.
टीम बांगलादेश ए | सैफ हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तंजीद हसन, जाकिर हसन, महमूदुल हसन जॉय, सौम्य सरकार, अकबर अली (विकेटकीपर), महेदी हसन, रकीबुल हसन, तंजीम हसन साकिब आणि रिपन मोंडोल.