नवी दिल्ली | अफगाणिस्तान टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिला उलटफेर केला. अफगाणिस्तानने गत वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडला पराभवाची धुळ चारली आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडवर 69 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने 285 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानसमोर गुडघे टेकले. अफगाणिस्तान 40.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 215 धावांवर ऑलआऊट झाली. अफगाणिस्तानने इंग्लंड विरुद्ध बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग या तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी केली. अफगाणिस्तानने खऱ्या अर्थाने सांघिक कामगिरी केली. मात्र कॅप्टन हशमतुल्लाह शाहिदी याने अफगाणिस्तानच्या विजयाचं श्रेय हे एकट्या खेळाडूलाच दिलं. अफगाणिस्तान कॅप्टन विजयानंतर काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.
“मी खूप आनंदी आहे,सर्व सहकारी खेळाडूही आनंदी आहेत. अफगाणिस्तानसाठी हा ऐतिहासिक विजय आहे. आमचा या विजयामुळे आत्मविश्वास वाढला आहे. याचा फायदा आम्हाला पुढील सामन्यांसाठी होईल. मला खूप अभिमान आहे. या विजयाचं श्रेय हे ओपनिंग जोडीला आहे. आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. पण आम्ही दुर्दैवाने मिडल ऑर्डरमध्ये विकेट्स गमावल्या. विजयाचं श्रेय हे सलामी जोडीला. त्यातही विशेषत: गुरबाजला”, असं हशमतुल्लाह शाहिदी म्हणाला.
रहमानुल्लाह गुरुबाज आणि इब्राहिम झद्रान या सलामी जोडीने 114 धावांची भागादारी केली. तर रहमानुल्लाह गुरुबाज याने सर्वाधिक 80 धावा केल्या. तर इब्राहीम झद्रान याने 28 धावा करत रहमानुल्लाह याला चांगली साथ दिली.
अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय
Afghanistan captain Hashmatullah Shahidi: I am quite happy, the whole team is happy, this is the best win for us. The confidence will be there for us now and the whole country will be proud of us. A lot of credit to the openers, the way they started, they gave us a lot of… pic.twitter.com/cnLbYCZe5H
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) October 15, 2023
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.