नवी दिल्ली | अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडला पराभूत करत मोठा उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडवर 69 धावांनी मात केली आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडला विजयासाठी 285 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अफगाणिस्तानच्या बॉलिंगसमोर इंग्लंडने धावांवर गुडघे टेकले. इंग्लंडला 40.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 215 धावाच करता आल्या. अफगाणिस्तानचा हा यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला आणि मोठा विजय ठरला.
इंग्लंडकडून हॅरी ब्रूक याने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. ब्रूकने अफगाणि गोलंदाजांसमोर एकाकी झुंज दिली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने कुणीच साथ दिली नाही. ब्रूक एकटाच लढला. ब्रूकनंतर डेव्हिड मलान याने 32 धावांचं योगदान दिलं. आदील रशिद याने 20 धावांचं योगदान दिलं. मार्क वूड 18 धावांवर आऊट झाला. रीसे टोपली 15 धावांवर नाबाद राहिला. जो रुट 11 धावांवर आऊट झाला. लियाम लिविंगस्टोन आणि सॅम करन या दोघांनी प्रत्येकी 10-10 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. ख्रिस वोक्स आणि कॅप्टन जोस बटलर या दोघांनी 9-9 रन्स केल्या. तर जॉनी बेरस्टो 2 रन्सवर आऊट झाला.
अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खान या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स काढल्या. मोहम्मद नबी याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. फझलहक फारुकी आणि नवीन उल हक या दोघांनी 1-1 विकेट घेतल इतरांना चांगली साथ दिली.
दरम्यान त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून अफगाणिस्तानला बॅटिंगला बोलावलं. अफगाणिस्तानने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 284 धावा केल्या. रहमानुल्लाह गुरुबाज आणि इब्राहिम झद्रान या सलामी जोडीने 114 धावांची भागादारी करत अफगाणिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र अफगाणिस्तानने नंतर झटपट विकेट्स गमावल्या. मात्र त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये इक्रम अलीखिल याने अर्धशतक करत अफगाणिस्तानचा डाव सावरला. तर अखेरीस मुजीब उर रहमान आणि राशिद खान या जोडीने फिनिशिंग टच दिला.
रहमानुल्लाह गुरुबाज याने सर्वाधिक 80 धावा केल्या. इब्राहीम झद्रान याने 28 धावा केल्या. रहमत शाह 3 धावांवर आऊट झाला. कॅप्टन रहमतुल्लाह शाहिदी 14 धावांवर आऊट झाला. अझमतुल्लाह याने 19 धावांचं योगदान दिलं. इक्रम अलीखिल याने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद नबी 9 धावांवर आऊट झाला. राशिद खान याने 23 आणि मुजीब उर रहमान याने 28 धावांची खेळी केली. या जोडीने अखेरच्या क्षणी केलेली खेळी निर्णायक ठरली. तर नवीन उल हक याने 5 आणि फझलहक फारुकी याने नाबाद 2 धावा केल्या.
अफगाणिस्तानचा उलटफेर
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐖𝐈𝐍! 🎊
What a momentous occasion for Afghanistan as AfghanAtalan have defeated England, the reigning champions, to register a historic victory. A significant achievement for Afghanistan! 🤩👏#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvENG | #WarzaMaidanGata pic.twitter.com/miNw8WcDsw
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 15, 2023
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.