इंग्लंडने श्रीलंकेवर कसोटी मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडवर टी 20i मालिकेत 3-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने येण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंग्लंड मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या टी 20i मालिकेला 11 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सलामीच्या सामन्याच्या काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडकडून तिघांना पदार्पणाची संधी दिली गेली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंड आपल्या नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत टी 20i मालिका खेळणार आहे. जॉस बटलर याला दुखापतीमुळे या टी 20i मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे फिल सॉल्ट हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर जॉस बटलर याच्या जागी ऑलराउंडर जेमी ओवरटन याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे फिल सॉल्ट आणि जेमी ओवरटन या दोघांवर बटलरच्या अनुपस्थितीत चमकदार कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. तसेच जॉर्डन कॉक्स, जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन या तिघांना पदार्पणाची संधी दिली गेली आहे.
उभयसंघातील गेल्या 5 सामन्यांमध्ये इंग्लंडने 2 वेळा विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. तर 2 सामने पावसामुळे वाया गेले. उभयसंघात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत आमनासामना झाला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्यानंतर आता इंग्लंड मायदेशातील या टी 20i मालिकेसाठी सज्ज आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी 20i मॅचसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन
We’ve named our XI to kick off our IT20 series with Australia 📝
Three debutants 🫡#ENGvAUS | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) September 10, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट (कॅप्टन) , विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम करन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद आणि रीस टोपली.
टी 20सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेवीहिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, रिले मेरेडिथ, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, सीन एबॉट, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा.