इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20I मालिकेला बुधवार 11 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. उभयसंघातील सलामीचा सामना हा साउथम्पटन येथील द रोज बाऊल स्टेडियम येथे होणार आहे. इंग्लंडने नुकतंच श्रीलंकेवर 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने स्कॉटँलडचा टी 20I मालिकेत 3-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. टी 20 मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. नियमित कर्णधार जॉस बटलर याच्याशिवाय इंग्लंड मैदानात उतरणार आहे. बटरलच्या अनुपस्थितीत फिल सॉल्ट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर शॉन मार्श ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. या मालिकेनिमित्त उभयसंघातील हेड टु हेड आकडेवारी जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 24 टी20I सामने झाले आहेत. दोन्ही संघांची कामगिरी बरोबरीची राहिली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 11-11 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तर गेल्या 5 पैकी 2 सामन्यांमध्ये इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला आहे. तर 2 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. आकडेवारी पाहता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे या मालिकेत उभयसंघात कडवी झुंज पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
इंग्लंडचा सलामीच्या सामन्याआधी जोरदार सराव
Preparation ✅
IT20 Series 🔜
🏴 #ENGvAUS 🇦🇺 pic.twitter.com/XkZsuc8mEm— England Cricket (@englandcricket) September 10, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट (कॅप्टन) , विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम करन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद आणि रीस टोपली.
टी 20सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेवीहिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, रिले मेरेडिथ, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, सीन एबॉट, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा.