ENG vs AUS 1st T20i : इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

| Updated on: Sep 11, 2024 | 11:18 PM

England vs Australia 1st T20i Toss: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20i सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्याचं आयोजन साऊथम्पटन येथे करण्यात आलं आहे.

ENG vs AUS 1st T20i : इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
eng vs aus 1st t20i
Follow us on

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये पहिला टी 20i सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन हे द रोज बॉल, साऊथम्पटन येथे करण्यात आलं आहे. जॉस बटलर याच्या अनुपस्थितीत फिल सॉल्ट इंग्लंडचं नेतृत्व करत आहे. तर मिचेल मार्श याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडने टॉस जिंकला. कॅप्टन फिल सॉल्ट याने फिल्डिंगचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

इंग्लंडकडून तिघांचं पदार्पण

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या पहिल्या सामन्यातून इंग्लंडकडून एकूण 3 खेळाडूंनी टी20i पदार्पण केलं आहे. जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन आणि जॉर्डन कॉक्स या तिघांना पदार्पणाची संधी मिळाली आहे. इंग्लंड क्रिकेटने या तिघांचे फोटो पोस्ट करत त्यांचं संघात स्वागत केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया संघात 3 खेळाडूंचं स्कॉटलँड विरूद्धच्या टी 20i मालिकेनंतर पुनरागमन झालं आहे. यामध्ये जोश हेझलवूड, मॅथ्यू शॉर्ट आणि झेवियर बार्टलेट या तिघांचा समावेश आहे.

दोन्ही संघ तुल्यबळ

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यां दोन्ही संघांमधीधल हा25 वा टी 20i सामना आहे. त्याआधीच्या 24 सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी ही बरोबरीची अशी आहे.  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी प्रत्येकी 11-11 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.  इंग्लंडने गेल्या 5 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाला 1 सामना जिंकण्यात यश आलं आहे.  आकडेवारी पाहता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे या मालिकेत उभयसंघात कडवी झुंज पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

इंग्लंडचा बॉलिंगचा निर्णय

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्श (कॅप्टन), जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट (कॅप्टन आणि विकेटकीपर), विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम करन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद आणि रीस टोपले.