लॉर्ड्स | अॅशेस मालिकेत इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्टीव्हन स्मिथ याने इंग्लंड विरुद्ध शतक ठोकलं. स्टीव्हनच्या कसोटी कारकीर्दीतील हे 32 वं शतक ठरलं. लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये शतक करणं हे प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं.तशी भव्य शतकी खेळी स्टीव्हनने केली. शतक केल्यानंतर त्या खेळाडूंच सहकाऱ्यांकडून अभिनंदन केलं जातं. मात्र स्टीव्हनने असं काही केलंय, ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.
स्टीव्हन शतक ठोकल्यानंतर झोपण्याबाबत विचार करत होता. स्टीव्हनने या दुसऱ्या टेस्ट मॅचआधी दिनक्रमाबाबत माहिती दिली. “मला टेस्ट मॅचच्या पहिल्या डावाआधी झोपण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मी प्रतिस्पर्धी संघाचा दृष्टीकोन आणि त्यांच्या डावपेचांबाबत विचार करतो, असं स्टीव्हन म्हणाला. स्टीव्हन स्काय स्पोर्ट्ससोबत बोलत होता.
स्टीव्हनने ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात पहिल्या डावात शतक करुन संकटमोचकाची भूमिका बजावली. स्टीव्हनच्या शतकामुळेच ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली.
“पहिल्या डावाआधी मला झोपण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सर्व बॉलर्स माझ्या जवळ येत असल्याचं मी कल्पना करतो”, असं स्टीव्हन म्हणाला. स्टीव्हनने शतकी खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजार आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 15 धावंचा टप्पा ओलांडला.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात स्टीव्हन स्मिथ याच्या 110 धावांच्या खेळीच्या जोरावर 416 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 91 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात या आघाडीच्या मदतीने इंग्लंडला किती धावांचं आव्हान देते, याकडे क्रिकेट विश्वाची बारीक नजर असणार आहे.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पॉप, जो रुट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), स्टुअर्ट बॉर्ड, ऑली रॉबिन्सन, जॉश टंग आणि जेम्स एंडरसन.