Steven Smith | स्टीव्हन स्मिथ याचा महारेकॉर्ड, इंग्लंड विरुद्ध मोठा कारनामा

| Updated on: Jun 30, 2023 | 1:41 AM

Steven Smith Eng vs Aus 2nd Test | ऑस्ट्रेलियाचा स्टार आणि अनुभवी बॅट्समन स्टीव्ह स्मिथ याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मोठा विक्रम केला आहे.

Steven Smith | स्टीव्हन स्मिथ याचा महारेकॉर्ड, इंग्लंड विरुद्ध मोठा कारनामा
ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार आणि महत्त्वाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथच्या मनगाटाला दुखापत झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वन डे मालिकेमध्ये दुखापतीमुळे त्याला खेळता आलं नाही.
Follow us on

लॉर्ड्स | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने इंग्लंड विरुद्ध शानदार शतकी खेळी केली. स्टीव्हच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ऑलआऊट 416 धावा करता आल्या. स्टीव्हन स्मिथ याने 184 बॉलमध्ये 15 चौकारांच्या मदतीने 110 धावांची खेळी केली. स्टीव्हनने या शतकासह कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या. इतकंच नाही, तर स्टीव्हनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला.

ब्रायन लारा याचा रेकॉर्ड ब्रेक

स्टीव्हनने यासह वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. स्टीव्हनने 351 डावांमध्ये 15 हजार धावा पूर्ण केल्या. तर ब्रायन लारा याने 354 इनिंग्समध्ये ही कामगिरी केली होती. तसेच वेगवान म्हणजेच कमी डावात 15 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम हा टीम इंडियाच्या विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने 333 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग

ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 416 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथ यानेच सर्वाधिक धावा केल्या. तसेच डेव्हिड वॉर्नर याने 66 धावांची खेळी केली. पहिल्या सामन्याचा हिरो उस्मान ख्वाजा 17 धावांवर आऊट झाला. मार्नस लार्बुशेन 47 धावांवर आऊट झाला. टेव्हिस हेड याने 77 धावांचं योगदान दिलं. कॅमरुन ग्रीन याला भोपळाही फोडता आला नाही. एलेक्स कॅरी याने 22 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

मिचेल स्टार्क याने 6, नॅथन लायन याने 7 आणि जोश हेझलवूड याने 4 धावा केल्या. तर कॅप्टन पॅट कमिन्स याने नाबाद 22 धावा केल्या. इंग्लंडकडून रॉबिन्सन आणि जॉश टंग या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. जो रुट याने 2 विकेट्स घेतल्या. तर जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ट बॉर्ड या दोघांनी प्रत्येकी 1-1 बॅट्समनला आऊट केलं.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पॉप, जो रुट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), स्टुअर्ट बॉर्ड, ऑली रॉबिन्सन, जॉश टंग आणि जेम्स एंडरसन.