इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजयाचं खातं उघडलं आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमवर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात डीएलएसनुसार 46 धावांनी विजय मिळवत मालिकेतील आव्हान कायम ठेवलं आहे. ऑस्ट्रेलिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर होती. त्यामुळे यजमान इंग्लंडसाठी तिसरा सामना हा ‘करो या मरो’ असा होता. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने 37.4 ओव्हरमध्ये कॅप्टन हॅरी ब्रूक याच्या शतकी खेळीच्या जोरावर 4 विकेट्स गमावून 254 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबला. बरेच वेळ पाऊस थांबवण्याची प्रतिक्षा करण्यात आली. मात्र पाऊस न थांबल्याने अखेर इंग्लंडला विजयी जाहीर करण्यात आलं.
इंग्लंडकडून कॅप्टन हॅरी ब्रूक याने 94 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 110 धावा केल्या. तर लियाम लिविंगस्टोन याने 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 20 बॉलमध्ये नॉट आऊट 33 रन्स केल्या. त्याआधी जेमी स्मिथ याने 7 आणि बेन डकेटने 8 धावा केल्या. विल जॅक्सने 82 बॉलमध्ये 9 फोर आणि 1 सिक्ससह 84 रन्स केल्या. तर फिलिप सॉल्ट याला भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
दरम्यान त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेन याला भोपळा फोडता आला नाही. मात्र मार्नस व्यतिरिक्त सर्व फलंदाजांना आश्वासक सुरुवात मिळाली. स्टीव्हन स्मिथ आणि एलेक्स कॅरी या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर आरोन हार्डी आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी 40+ धावा केल्या. मात्र इतर तिघांना या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही.
स्टीव्हननने 60 धावा केल्या. आरोन हार्डी आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी अनुक्रमे 44 आणि 42 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल 30, कॅप्टन मिचेल मार्श 24 आणि मॅथ्यू शॉर्ट याने 14 धावा केल्या. तर अखेरीस अॅलेक्स कॅरी आणि शॉन एबॉट ही जोडी नाबाद परतली. कॅरीने 65 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 77 रन्स केल्या. तर एबॉट 2 धावांवर नाबाद परतला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर याने 2 विकेट्स मिळवल्या. तर लियाम लिविंगस्टोन, विल जॅक्स, ब्रायडन कार्स आणि जेकब बेथेल या चौघांनी 1-1 विकेट घेतली.
इंग्लंड विजयी
🏴 This series is still alive! 🦁
Next stop, @HomeOfCricket 🏟
🏴 #ENGvAUS 🇦🇺 | #EnglandCricket pic.twitter.com/9a7DCNPcn8
— England Cricket (@englandcricket) September 24, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्श (कॅप्टन), स्टीव्हन स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, शॉन एबॉट, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर आणि मॅथ्यू पॉट्स.