लीड्स | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हेडिंग्ले लीड्समध्ये अॅशेस सीरिज 2023 मधील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातून मिचेल मार्श याने 4 वर्षांनी कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. मिचेल मार्श याने 4 वर्षांनंतर शानदार एन्ट्री घेत इंग्लंड विरुद्ध शतक ठोकलं. मार्शने 102 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. मार्शच्या कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं शतक ठरलं. मार्शने एकूण 118 धावांची खेळी केली. मार्शने या खेळीत 17 चौकार आणि 4 सिक्स ठोकले.
मिचेल मार्श याचं शानदार शतक
Mitchell Marsh ?
Walked in at 85/4 and has made a hundred in his first Test match since 2019 ?#WTC25 | #ENGvAUS ?: https://t.co/CIqx6cWyPZ pic.twitter.com/h7z73gMIPF
— ICC (@ICC) July 6, 2023
दरम्यान मिचेल मार्श याच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 250 मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 263 धावा केल्या. मिचेल मार्श याच्याशिवाय एकालाही मोठी खेळी साकारता आली नाही.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर याने 4, उस्मान ख्वाजा याने 13, मार्नस लाबुशेन याने 21, 100 वी कसोटी खेळणाऱ्या स्टीव्हन स्मिथ याने 22, ट्रेव्हिस हेड याने 39, एलेक्स कॅरी 8, मिचेल स्टार्क 2, कॅप्टन पॅट कमिन्स 0 आणि टॉड मर्फी याने 13 धावा केल्या. तर स्कॉट बॉलँड झिरोवर नाबाद परतला.
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यातून कमबॅक केलेल्या मार्क वूड याने सर्वाधिक 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला सुरंग लावला. तर ख्रिस वोक्स याने 3 आणि स्टुअर्ट ब्रॉड याने 2 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास केला.
त्यानंतर इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोवर 19 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 68 धावा केल्या आहेत. जो रुट 19 आणि जॉनी बेयरस्टो 1 धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी इंग्लंड कशी कामगिरी करते, याकडे क्रिकेट विश्वाची बारीक नजर असणार आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड टीम प्लेईंग इलेव्हन
बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, ओली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलँड आणि टॉड मर्फी.