Eng vs Aus 4th Test Ashes Series | चौथी टेस्ट ड्रॉ, पावसामुळे इंग्लंडच्या स्वप्नावर ‘पाणी’, ऑस्ट्रेलियाकडून सीरिजवर कब्जा

| Updated on: Jul 24, 2023 | 2:15 AM

Ashes Series 2023 AUS vs ENG 4th Test | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या टेस्ट मॅचमधील पाचव्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सामना ड्रॉ राहिला.

Eng vs Aus 4th Test Ashes Series | चौथी टेस्ट ड्रॉ, पावसामुळे इंग्लंडच्या स्वप्नावर पाणी, ऑस्ट्रेलियाकडून सीरिजवर कब्जा
Follow us on

मँचेस्टर | अ‍ॅशेस सीरिजमधील चौथ्या कसोटी सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पावसामुळे खेळ वाया गेला. त्यामुळे चौथा सामना अनिर्णित अर्थात ड्रॉ राहिला. सामना ड्रॉ राहिल्याने ऑस्ट्रेलियाने मालिका कायम राखली. ऑस्ट्रेलिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला हा सामना ड्रॉ राहिल्याने इंग्लंडला मोठा झटका लागलाय. त्यामुळे इंग्लंडच्या गोटात काही प्रमाणात नाराजीचं वातावरण आहे. पावसाने इंग्लंडसाठी व्हिलनची भूमिका बजावली.

ऑस्ट्रेलियाने शनिवारी 22 जूलै रोजी दुसऱ्या डावात 5 विकेट्स गमावून 214 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात इंग्लंडच्या तुलनेत 61 धावांची पिछाडीवर होती. शनिवारी पावसामुळे फक्त 30 ओव्हरचा गेम होऊ शकला. पाचव्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यानुसार वरुणराजा जोरदार बरसला. त्यामुळे खेळ होऊ शकला नाही.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू जो रुट याने ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन याला 111 धावांवर आऊट केलं. रुटने ही विकेट घेतल इंग्लंडला मोठा दिलासा मिळाला. इंग्लंडने चहापानापर्यंत 214 धावा करुन 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया इंग्लंडच्या तुलनेत 61 धावांनी पिछाडीवर होती. मात्र पावसाच्या बॅटिंगमुळे पुढे काहीच होऊ शकलं नाही. मिचेल मार्श 31* आणि कॅमरुन ग्रीन 3 धावांवर नाबाद राहिला.

पावसामुळे इंग्लंडचा गेम ओव्हर

दरम्यान मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा 27 जुलै ते 31 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. हा सामना केनिंग्टन ओव्हल लंडन खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा पाचवा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याचा मानस असेल. त्यामुळे पाचव्या सामन्यात निश्चितच क्रिकेट चाहत्यांना निश्चितच चढाओढ पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन,