मँचेस्टर | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस सीरिज 2023 मधील पाचव्या आणि अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. या पाचव्या सामन्याचं आयोजन हे केनिंग्टन ओव्हल लंडन इथे करण्यात आलंय. या पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. चौथा सामना ड्रॉ राहिल्याने ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेची असलेली ही मालिका कायम राखली.
आता मात्र इंग्लंडचा पाचवा सामना जिंकून मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर ऑस्ट्रेलिया इंग्लंड चितपट करुन मालिका विजयाच्या आशेने मैदानात उतरली आहे. या पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. कांगारुंनी अंतिम 11 खेळाडूंमध्ये 1 बदल केलाय.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला
England XI: Ben Duckett, Zak Crawley, Moeen Ali, Joe Root, Harry Brook, Benjamin Stokes (c), Jonathan Bairstow (wk), Christopher Woakes, Stuart Broad, Mark Wood, James Anderson #Ashes
— cricket.com.au (@cricketcomau) July 27, 2023
टीम मॅनेजमेंटने ऑलराउंडर खेळाडूला बाहेर बसवलंय. तर त्याच्या जागी युवा अष्टपैलूचा समावेश केलाय. कॅमरुन ग्रीन याच्या जागी टॉड मर्फी याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
दरम्यान इंग्लंड क्रिकेट टीमने या पाचव्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. या इंग्लंडने या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. टीम मॅनेजमेंटने आपल्या त्याच टीमवर विश्वास दाखवत प्लेईंग इलेव्हन कायम ठेवलीय.
ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात सलग विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. तर तिसरा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेतील आव्हान कायम ठेवलं. मात्र चौथ्या सामन्यातील पाचवा दिवस हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे इंग्लंडला असलेली विजयाची संधी पावसाने हिरावून घेतली. चौथा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मालिका कायम राखण्यात यश आलं.
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बॅन डकॅट, झॅक क्राउली, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि टॉड मर्फी.