मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन संघ आमनेसामने येणार आहेत. इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. इंग्लंडने आतापर्यंत 6 सामने खेळले असून फक्त एका सामन्यात विजय मिळाला आहे पण ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीचा मार्गात खोडा टाकू शकते. ऑस्ट्रेलियाला इंग्लंड विरुद्धचा सामना काही करून जिंकावा लागणार आहे. कारण एक पराभव उपांत्य फेरीचं गणित बिघडवू शकतं. दोन्ही संघ आतापर्यंत 115 वेळा आमनेसामने आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 87, तर इंग्लंडने 63 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामने टाय आणि तीन सामने अनिर्णित ठरले आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ 9 वेळा भिडले आहेत. यात सहा वेळा ऑस्ट्रेलियाने, तर 3 वेळा इंग्लंडने विजय मिळवला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. या खेळपट्टीवर चेंडू चांगल्याप्रकारे उसळी घेतो. तर फिरकीपटूंना मधल्या षटकांमध्ये मदत मिळू शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला पसंती दिली जाऊ शकते. दुसरीकडे, डेविड वॉर्नर या स्पर्धेत फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत दोन शतकं ठोकली आहेत. ट्रॅविस हेड, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनीही शतक ठोकलं आहे. मिचेल स्टार्कही यालाही सूर गवसला आहे. जोश हेझलवूड, एडम झाम्पा आणि पॅट कमिन्स यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. तर इंग्लंडकडून एकाही खेळाडूने शतक ठोकलेलं नाही.
इंग्लंड : जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेविड विली, आदिल रशीद, मार्क वुड.
ऑस्ट्रेलिया : डेविड वॉर्नर, ट्रॅविस हेड, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरन ग्रीन, जॉश इंग्लिस, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा, जोश हेजलवुड.