मुंबई : भारत आणि इंग्लंडध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांची घसरगुंडी उडालेली दिसली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 229-9 धावा केल्या. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याने जिगरबाज 87 धावांची खेळी करत संघासाठी सर्वाधिक धावांची खेळी केली. तर भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यानेही 49 धावांची महत्त्वाची खेळी केली. भारतीय संघ अडचणीत सापडला असताना सूर्याने केलेल्या 49 धावा शतकापेक्षा कमी नव्हत्या. सोशल मीडियावर सूर्याचं कौतुक होताना दिसत आहे.
भारतीय संघाची टॉ ऑर्डर आज फेल गेलेली दिसली, शुबमन गिल 9 धावा, विराट कोहली 0 धावा, श्रेयस अय्यर 4 धावा करून झटपट बाद झाले. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी चांगली भागीदारी करत डाव सावरला पण 91 धावा जोडणारी ही जोडी इंग्लंडच्या गोलंदाजांनी फोडली. के. एल. राहुल आऊट झाल्यावर रोहित शर्माही 87 धावांवर आऊट झाला. जडेजा आजही काही धावा काढून लवकर माघारी गेला.
वन डे फॉरमॅटमध्ये फ्लॉप जाणारा सूर्यकुमार यादव तळाच्या गोलंदाजांसह खेळत होता. सूर्याने आपल्या स्टाईलने बॅटींग न करता सावध खेळ केला आणि बुमराहच्या साथीने भारताची धावसंख्या 200 च्या पार करून दिली. सूर्याचे वन डे मध्ये अधिक चांगले रेकॉर्ड नाहीत, आज सूर्या 49 धावांवर असताना त्याने एक धाव घेत आपलं अर्धशतक पूर्ण न करता मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण कॅच आऊट झाला. दुसऱ्या एखाद्या प्लेअरने आपलं अर्धशतक पूर्ण करत नंतर मोठे शॉट मारले असते. मात्र सूर्या भाऊने संघाची धावसंख्या वाढवताना आपल्या रेकॉर्डकडे लक्ष दिलं नाही.
दरम्यान, टी-२० क्रिकेटच्या बादशहाची हीच गोष्ट सर्व क्रीडा चाहत्यांना आवडली. शतकापेक्षा त्याच्या 49 धावा मोलाच्या ठरल्या. भारतासाठी भविष्यात सूर्या मोठा खेळाडू असल्याने त्याला संघात जागी दिली आहे. सूर्यानेही अनेकदा त्याची ताकद दाखवून दिली आहे.