Cricket | आधी निवृत्तीची घोषणा, मग घूमजाव, आता टीमसाठी मैदानात

| Updated on: Sep 08, 2023 | 5:59 PM

Icc World Cup 2023 | टीमच्या माजी कर्णधाराने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी निवृत्तीचा निर्णय फिरवला. त्यानंतर हा खेळाडू आता टीमसाठी मैदानात उतरला आहे.

Cricket | आधी निवृत्तीची घोषणा, मग घूमजाव, आता टीमसाठी मैदानात
Follow us on

मुंबई | आयसीसी वर्ल्ड कपसाठी एकूण 10 संघ सज्ज झाले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेआधी प्रत्येकी टीम ही आपल्या पद्धतीने जोरदार सराव करतेय. एकाबाजूला वर्ल्ड कपआधी आशिया कप 2023 सुपर 4 मध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश आमनेसामने आहेत. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सीरिज सुरु आहे. वर्ल्ड कपआधीच्या या स्पर्धा आणि मालिकेतून प्रत्येक टीम कसून मेहनत घेतेय. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. टीमच्या एका दिग्गज आणि माजी कर्णधाराने वर्ल्ड कपसाठी निवृत्तीचा निर्णय फिरवलाय. आपल्या टीमला वर्ल्ड कप जिंकवण्याच्या निर्धाराने त्याने हा निर्णय घेतलाय.

त्यानंतर आता हा क्रिकेटर टीमसाठी मैदानात उतरला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार आणि बेन स्टोक्स याने टीममध्ये कमबॅक केलंय. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे सीरिजला आजपासून (8 सप्टेंबर) सुरुवात झालीय. या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यासाठी बेन स्टोक्स याला प्लेईंग ईलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे वर्षभराच्या अंतराने स्टोक्स वनडेत कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

बेन स्टोक्स याचं कमबॅक


दरम्यान बेन स्टोक्स याने अखेरचा वनडे सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध 19 जुलै 2022 रोजी खेळला होता. त्यानंतर स्टोक्स वनडेतून निवृत्त झाला. मात्र त्याने वर्ल्ड कपसाठी निवृत्तीच्या निर्णयावरुन यू टर्न घेतला. स्टोक्सची वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टीममध्ये निवडही करण्यात आली आहे. वर्ल्ड कपमधील पहिला साखळी सामना हा 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेविड मलान, हॅरी ब्रूक, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद आणि रीस टोपली.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टीम साउथी आणि लॉकी फर्ग्युसन.