Eng vs Nz | Devon Conway आणि Daryl mitchell याचं शतक, न्यूझीलंडचा इंग्लंडवर 8 विकेट्सने विजय

| Updated on: Sep 09, 2023 | 2:05 AM

England vs New Zealand 1st ODI | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेआधीच्या वनडे सीरिजमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा 8 विकेट्सने खुर्दा उडवलाय. डॅरेल मिचेल आणि डेव्हॉन कॉनव्हे या जोडीने न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

Eng vs Nz | Devon Conway आणि Daryl mitchell याचं शतक, न्यूझीलंडचा इंग्लंडवर 8 विकेट्सने विजय
Follow us on

मुंबई | न्यूझीलंड क्रिकेट टीमने इंग्लंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाकेदार विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवलाय. न्यूझीलंडने 8 विकेट्सने धुव्वा उडवलाय. इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 292 धावांचं आव्हान हे न्यूझीलंडने 45.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. डेव्हॉन कॉनव्हे आणि डॅरेल मिचेल या जोडीने नाबाद विजयी भागीदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 180 धावांची नाबाद भागीदारी केली. तसेच या दोघांनी नाबाद शतकी खेळी केली. न्यूझीलंडने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

न्यूझीलंडची बॅटिंग

न्यूझीलंडची 292 धावांचं पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली. डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग या दोघांनी 61 धावांची सलामी भागीदारी केली. विल यग 29 धावा करुन माघारीी परतला. त्यानंतर हेन्री निकोलस याच्यासोबत कॉन्व्हेने दुसऱ्या विकेटसाठी 54 रन्सची पार्टनरशीप केली. निकोलस 26 रन्स करुन मैदानाबाहेर गेला. डॅरेल मिचेल मैदानात आला. या दोघांनीच इंग्लंडचा बाजार उठवला. या दोघांनी 157 बॉलमध्ये 180 रन्सची नाबाद विजयी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी चौफेर फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. तसेच वैयक्तिक शतकंही पूर्ण केली.

हे सुद्धा वाचा

न्यूझीलंडचा धमाकेदार विजय

डॅरेलने 91 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 118 धावा केल्या. तर कॉनव्हेने 121 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 13 चौकारांसह नॉट आऊट 111 धावा केल्या. इंग्लंडकडून डेव्हिड विली आणि आदिल रशिद या दोघांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट गेली.

इंग्लंडची बॅटिंग

त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंग्लंडने चौघांच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 291 पर्यंत मजल मारली. जॉस बटलर 72, डेव्हिड मलान 54, लियाम लिविंगस्टोन आणि निवृत्तीतून यू टर्न घेतलेल्या बेन स्टोक्स या दोघांनी प्रत्येकी 52 धावा केल्या. तसेच इतरांनीही छोटेखानी खेळी करत चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून रचीन रवींद्र याने 3 टीम साऊथीने 2 विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्यूसन याने 1 शिकार केली.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेविड मलान, हॅरी ब्रूक, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद आणि रीस टोपली.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टीम साउथी आणि लॉकी फर्ग्युसन.