इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसल्याचं दिसलं. पहिल्या डावात इंग्लंडने सर्वगडी बाद 280 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ गडगडला आणि 125 धावांपर्यंत मजल मारू शकला. यामुळे इंग्लंडने 155 धावांची आघाडी होती. यात इंग्लंडने दुसऱ्या डावात 427 धावांची भर घातली आणि 582 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडने 426 धावांवर 6 गडी गमावल्यानंतर डाव घोषित केला होता. पण इंग्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अडखळला आणि 259 धावा करू शकला. यासह इंग्लंडने न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताला 3-0 ने पराभूत केल्याने आशा वाढल्या होत्या. मात्र आता स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका हे चार संघ आता अंतिम फेरीच्या शर्यतीत आहेत.
इंग्लंडकडून पहिल्या डावात हॅरी ब्रूकने 115 चेंडूत 123 धावांची खेळी केली होती. तर गोलंदाजीत गस एटकिनसनने आणि ब्रायडन कार्सेने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या होत्या. तर ख्रिस वोक्स आणि स्टोकने प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून जो रूटची बॅट चांगलीच तळपळी त्याने 106 धावांची खेळी केली. तर डकेट आणि जेकॉब बेथेल यांचं शतक अवघ्या काही धावांनी हुकलं. तर गोलंदाजीत बेन स्टोक्सने 3,शोएब बशीरने 2, ब्रायडन कार्सेने 2, ख्रिस वोक्सने 2 आणि गस एटकिनसनने 1 गडी बाद केला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना 14 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), बेन स्टोक्स (कर्णधार), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, टिम साऊदी, विल्यम ओरर्के