मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघ इंग्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. इंग्लंडने दिलेल्या 283 आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे याने झंझावती शतक केलं आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात पहिलं शतक झळकवण्याचा करत इतिहास रचला आहे. वन डे वर्ल्ड कप 2023 मध्ये शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरूवातीपासूनच डेव्हॉन कॉनवे याने आक्रमक पवित्रा घेतला होता. विल यंग आऊट झाल्यानंतर रचिन रविंद्र याच्यासोबत भागीदारी रचत विजयाचा भक्कम केलाय. डेव्हॉन कॉनवे याने 83 बॉलमध्ये 100 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 13 चौकार आणि 2 षटकार मारले. या शतकासह आपल्या कारकिर्दीमधील 5 व्या शतकाला गवसणी घातली आहे.
न्यूझीलंड संघ बॅटींगला आल्यावर सुरूवातीलाच सॅम करन याने पहिल्या बॉलवर यंग याला आऊट करत खतरनाक सुरूवात केली होती. त्यानंतर खेळायला आलेल्या रचिन रविंद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांनी शतकी भागीदारी करत संघाला विजयाजवळ आणलं. सुरूवातीला रचिनने काऊंटर अटॅक केला त्यानंतर डेव्हॉन कॉनवेने सूत्रे आपल्या हाती घेत इंग्लंड संघाला बॅकफूटला ढकललं. रचिनेही कॉनव्हे पाठोपाठ शतक केलं. रचिन रवींद्र हा न्यूझीलंड संघासाठी कमी वयामध्ये शतक करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यासोबतच पठ्ठ्याने पदार्पण सामन्यात शतक केलं आहे.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (w/c), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w/c), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट