मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिला सामना हा नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. या सामन्याला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर दुसरा सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड समोर दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. दोन्ही टीम बरोबरीच्या आहेत. त्यामुळे या सामन्यात चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. हा सामना कुठे होणार, कधी सुरुवात होणार हे सर्व जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मुंबईत वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना असणार आहे.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅच मोबाईलवर फुकटात डिज्नी प्ल्स हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दक्षिण आफ्रिका टीम | टेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी ड्युसेन, विल्यम ड्युसेन आणि लीडर वॅन्सी .
इंग्लंड टीम | जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.