ENG vs SL : इंग्लंड 214 धावांनी पिछाडीवर, पहिल्या दिवसाचा खेळ संपला

| Updated on: Aug 21, 2024 | 11:42 PM

England vs Sri Lanka 1st Test Day 1 Stumps: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सलामीच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला आहे.

ENG vs SL : इंग्लंड 214 धावांनी पिछाडीवर, पहिल्या दिवसाचा खेळ संपला
ENG vs SL milan rathnayake
Follow us on

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. पहिल्या दिवशी एकूण 96 षटकांचा खेळ झाला. या 96 ओव्हरमध्ये एकूण 10 विकेट्स गमावून 258 धावा झाल्या. श्रीलंकेचा पहिला डाव हा 74 ओव्हरमध्ये 236 धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंड बॅटिंगसाठी आली. इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 ओव्हरमध्ये बिनबाद 22 धावा केल्या आहे. त्यामुळे इंग्लंड पहिल्या डावात श्रीलंकेच्या तुलनेत 214 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बेन डकेट 12 बॉलमध्ये 13 रन्सवर नॉट आऊट परतला. तर डॅनियल लॉरेन्स याने 12 चेंडूत 9 धावांवर नाबाद परतला. त्याआधी इंग्लंडने श्रीलंकेला पहिल्या डावात 250 धावांच्या आत रोखलं. मात्र कॅप्टन धनंजया डी सिल्वा आणि डेब्यूटंट मिलन रथनायके या दोघांनी केलेल्या या अर्धशतकी खेळीमुळे श्रीलंकेला 200 पार मजल मारता आली. श्रीलंकेसाठी कॅप्टन धंनजय याने 84 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 74 धावांची खेळी केली. तर पदार्पणवीर मिलन रथनायके 135 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 72 रन्स केल्या. कुसल मेंडीस याने 34 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान दिलं.

मात्र उर्वरित फलंदाजांना फार काही खास करता आलं नाही. निशान मधुशंका आणि करुणारत्ने ही सलामी जोडी फ्लॉप ठरली. निशाने 4 आणि करुणारत्ने याने 2 धावा केल्या. तर अँजलो मॅथ्यूजला भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांनी 10 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र या चौघांना या आकड्याचं मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आलं नाही. तर इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि शोएब बशीर या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर गस एटीकन्सन याने दोघांना आऊट केलं. तर मार्क वूड याने 1 विकेट घेतली.

इंग्लंड-श्रीलंका कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो आणि मिलन रथनायके.