ENG vs SL: इंग्लंडकडे दुसऱ्या दिवसअखेर 23 धावांची आघाडी, श्रीलंकेसमोर रोखण्याचं आव्हान

| Updated on: Aug 23, 2024 | 1:18 AM

England vs Sri Lanka 1st Test Day 2 Stumps : इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात एमिरट्स ओल्ड ट्रॅफॉर्ड, मॅन्चेस्टर येथे हा पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने दुसर्‍या दिवसअखेर 23 धावांची आघाडी घेतली आहे.

ENG vs SL:  इंग्लंडकडे दुसऱ्या दिवसअखेर 23 धावांची आघाडी, श्रीलंकेसमोर रोखण्याचं आव्हान
england test cricket team
Image Credit source: Icc X account
Follow us on

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 23 धावांची आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात ऑलआऊट 236 धावा केल्या होत्या. इंग्लंडने दुसर्‍या दिवशी प्रत्युत्तरात या 236 धावांचा यशस्वी पाठलाग करत आघाडी घेतली. इंग्लंडकडे आता 23 धावांची आघाडी आहे. इंग्लंडने दुसर्‍या दिवासाचा खेळ संपेपर्यंत 4.25 च्या रन रेटने 61 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 259 धावा केल्या. आता इंग्लंडचा तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला श्रीलंकेसमोर यजमान संघाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.

दुसऱ्या दिवसात काय झालं?

इंग्लंडकडून बेन डकेट आणि डॅनियल लॉरेन्स या जोडीने दुसऱ्या दिवसाचा खेळाला सुरुवात केली. ही जोडी पहिल्या दिवशी नाबाद परतली होती. इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 22 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंड पहिल्या डावात श्रीलंकेच्या तुलनेत 214 धावांनी पिछाडीवर होती. दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने चांगली बॉलिंग केली. श्रीलंकेने इंग्लंडला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे हॅरी ब्रूक आणि जॅमी स्मिथ या दोघांचा अपवाद वगळता त्यांच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

हे सुद्धा वाचा

बेन डकेट याने 18 धावा केल्या. डकेटच्या रुपाने इंग्लंडने पहिली विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन ओली पोप याला 6 धावाच करता आल्या. डॅनियल लॉरेन्सने 30 धावांचं योगदान दिलं. अनुभवी जो रुट याला अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. रुटने 42 धावा केल्या. हॅरी ब्रूक याने 73 चेंडूत 56 धावांचं योगदान दिलं. तर ख्रिस वोक्सने 25 धावा केल्यानंतर मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत गस एटीकन्सन आणि जॅमी स्मिथ या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद 20 धावांची भागीदारी केली. जॅमी 72 आणि गस 4 धावांवर नाबाद परतले.

श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो याने आतापर्यंत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर प्रभात जयसूर्याने दोघांना आऊट केलं. तसेच विश्वा फर्नांडो याच्या खात्यात 1 विकेट गेली.

इंग्लंडकडे 23 धावांची आघाडी

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो आणि मिलन रथनायके.