वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेची सांगता झाली. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना 21 ऑगस्टपासून 2 कसोटी सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. एकाबाजूला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी आपली 11 खेळाडूंची फौज जाहीर केली आहे. तर इंग्लंडने 19 ऑगस्टलाच आपल्या प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली होती.
धनंजया डी सिल्वा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. श्रीलंकेच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये दिनेश चंडिमल आणि अँजेलो मॅथ्यूज या दोन्ही अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कुसल मेंडीस यालाही संधी दिली आहे. तसेच निवड समितीने प्रमुख खेळाडूंना संधी दिली आहे. तर दुसर्या बाजूला बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत ओली पोप हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर हॅरी ब्रूक याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बेन स्टोक्स याला द हन्ड्रेड स्पर्धेत दुखापत झाली. स्टोक्सला या दुखापतीमुळे मालिकेला मुकावं लागलं आहे.
उभसंघात एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. एकूण 21 दिवसांमध्ये हे 3 सामने होणार आहेत. हे तिन्ही सामने अनुक्रमे मँचेस्टर, लॉर्ड्स आणि केनिंग्टन ओव्हल येथे होणार आहेत.
पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, मँचेस्टर.
दुसरा सामना, 29 ऑगस्ट- 2 सप्टेंबर, लॉर्ड्स.
तिसरा सामना, 6-10 सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हल
श्रीलंकेची पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर
Sri Lanka Playing XI against England in the first Test match announced 📣 #ENGvSL https://t.co/1Je4NOZuXs
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 20, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो आणि मिलन रथनायके,
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), डॅन लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर