इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. उभयसंघात लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे हा सामना खेळव्यात येत आहे. यजमान संघाने पहिल्या दिवशी 7 विकेट्स गमावून 88 ओव्हरमध्ये 358 धावा केल्या. श्रीलंकेने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी बोलावलं. इंग्लंडंची सुरुवात अडखळत झाली. त्यांनी 100 धावांच्या आत 3 विकेट्स गमावल्या. तसेच श्रीलंकेकडून ठरावित अंतराने झटके देणं सुरुच होतं. मात्र जो रुट याने शतक ठोकत इंग्लंडचा डाव सावरला. त्यामुळे इंग्लंडला दिवसअखेर 350 पार मजल मारता आली.
गस एटकिंसन आणि मॅथ्यू पॉट्स ही जोडी नाबाद परतली. गस एटकिंसन याने 81 बॉलमध्ये 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 74 धावा केल्या. तर मॅथ्यू पॉट्सने 33 बॉलमध्ये 4 फोर ठोकून नॉट आऊट 20 रन्स केल्या. इंग्लंडसाठी जो रुट याने 206 बॉलमध्ये 18 चौकारांच्या मदतीने 143 धावांची खेळी केली.रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 33 वं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 49 वं शतक ठरलं. बेन डकेट याने 40 धावांचं योगदान दिलं. हॅरी ब्रूकने 33 धावांची भर घातली. विकेटकीपर जॅमी स्मिथने 21 रन्स केल्या. तर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. डॅनियल लॉरेन्स याने 9, ख्रिस वोक्स 6 आणि कॅप्टन ओली पोप याने 1 असं योगदान दिलं.
श्रीलंकेकडून तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. असिथा फर्नांडो, मिलन रथनायके आणि लहीरु कुमारा या तिघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर प्रभाथ जयसूर्याने 1 विकेट घेतली. आता दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. तर श्रीलंकेसमोर इंग्लंडला 400 च्या आत रोखण्याचं आव्हान असणार आहे.
पहिला दिवसाचा ‘गेम ओव्हर’
Root ton the highlight as England finish strong on day one of the Lord’s Test 👏#WTC25 | #ENGvSL: https://t.co/qXm72Ue0fF pic.twitter.com/oUbSUlzmDq
— ICC (@ICC) August 29, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके.