इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग दुसरं अर्धशतक ठोकलं आहे. जो रुट याने इंग्लंड पहिल्या सामन्यात नाबाद 62 धावांची खेळी केली. त्यानंतर आता रुटने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर अर्धशतकी खेळी केली आहे.रुटने या अर्धशतकासह रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रुटने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच आता रुटला टीम इंडियाचा माजी फलंदाज राहुल द्रविड याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
जो रुटने पहिल्या डावातील 39 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर 2 धावा घेत 84 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रुटची कसोटी कारकीर्दीतील ही 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची 97 वी वेळ ठरली आहे. रुटने यासह शिवनारायण चंद्रपॉल याला मागे टाकलं. चंद्रपॉलने त्याच्या कारकीर्दीत 164 कसोटी सामन्यांमध्ये 96 वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या. तर आता रुटला राहुल द्रविडचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे रुट हा विक्रम याच मालिकेत करु शकतो. राहुल द्रविडने 164 कसोटी सामन्यांमध्ये 99 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या. त्यामुळे जो रुटला सलग 3 अर्धशतक करुन द्रविडचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.
दरम्यान जो रुट हा अर्धशतकांपेक्षा अधिक (50+) धावा करणारा एकमेव सक्रीय फलंदाज आहे. रुटनंतर दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा केन विलियमसन हा दुसऱ्या तर टीम इंडियाच्या विराट कोहली तिसर्या स्थानी आहे. केनने कसोटी कारकीर्दीत 66 तर विराटने 59 वेळा (50+) धावा केल्या आहेत.
चंद्रपॉलचा रेकॉर्ड ब्रेक, रुटचा धमाका
Joe Root goes past Shivnarine Chanderpaul into the top five with his 97th fifty-plus score in Tests 🙌 #ENGvSL pic.twitter.com/iqYGkaLazU
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 29, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके.