इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटने या सामन्यातील पहिल्याच दिवशी शतक ठोकलंय.रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 33 वं शतक ठरलं आहे. रुट यासह इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला आहे. रुटने या शतकासह रोहित शर्मा याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रुटने रोहित शर्माला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांबाबत मागे टाकलं आहे.
रुटचं कसोटीतील हे 33 वं शतक ठरलं. रुटने याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 16 शतकं झळकावली आहेत. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्माने टीम इंडियाकडून टेस्ट, वनडे आणि टी 20I या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 48 शतकं केली आहेत. रोहितने या 48 पैकी सर्वात जास्त शतकं ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये केली आहेत. रोहितने वनडेमध्ये 31, कसोटीत 12 आणि टी 20I मध्ये 5 शतकं झळकावली आहेत.
आता रुटला इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक शतकं करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी आणखी एका शेकड्याची गरज आहे. इंग्लंडसाठी सद्यस्थितीत सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम हा माजी फलंदाज एलिस्टर कूक याच्या नावावर आहे. कूकने कसोटीत 33 शतकं केली आहेत. इंग्लंडसाठी रुट आणि कूक या दोघांव्यतिरिक्त कुणालाही 30 पेक्षा अधिक शतकं करता आलेली नाहीत.
दरम्यान सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा टीम इंडियाच्या विराट कोहली याच्या नावावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 80 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहेत. विराट 80 आंतरराष्ट्रीय शतकांसह अव्वल स्थानी आहे.तर दुसऱ्या स्थानी जो रुट (49) दुसऱ्या स्थानी आहे. तर आता रोहित शर्माची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके.