इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने इतिहास रचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत जो रुट याने टीमसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. बेन स्टोक्स आणि इतर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत रुटने आपली भूमिका चोखपणे पार पाडली. रुटने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे पहिल्या दिवशी अर्धशतकी खेळी करत इंग्लडंचा डाव सावरला. त्यानंतर रुटने एका बाजूला विकेट जात असताना रुटने दुसरी बाजू लावून धरली.रुटने एक एक धाव जोडत आता शतक झळकावलं आहे. रुटने या शतकासह धमाका केला आहे.रुटने या शतकासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
रुटने डावातील 63 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर लहिरु कुमारा याला चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. रुटने 162 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 33 वं शतक ठरलं. रुटने यासह ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉ, स्टीव्हन स्मिथ आणि न्यूझीलंडच्या केन विलियमसन या तिघांना मागे टाकलं आहे. या तिघांच्या नावे कसोटीत 32 शतकांची नोंद आहे. तसेच रुटने 33 व्या शतकासह आपल्याच माजी सहकाऱ्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. रुटने कूकच्या 33 शतकांची बरोबरी केली. रुट यासह इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकं करणारा संयुक्तरित्या पहिल्या फलंदाज ठरला.
दरम्यान आता रुटला कूकचा श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. रुटला या सामन्याआधी कूकला मागे टाकण्यासाठी 186 धावांची गरज होती. मात्र आता रुटला अवघ्या काहीच धावांची गरज आहे. एलिस्टर कूक याने श्रीलंकेविरुद्ध 16 सामने खेळले आहेत. कूकने त्यापैकी 28 डावांमध्ये 53.75 च्या सरासरीने 1 हजार 290 धावा केल्या आहेत. तर जो रुट दुसऱ्या स्थानी आहे. रुटने 11 सामन्यांमधील 20 डावात 1 हजार 105 धावा केल्या आहेत.
जो रुटचं 49 वं आंतरराष्ट्रीय शतक
A point to the sky. A kiss of the badge. ANOTHER Joe Root century. pic.twitter.com/9fIm1CsS8e
— England Cricket (@englandcricket) August 29, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके.